Milk benefits summer | उन्हाळ्यात ‘या’ कारणांसाठी दुधाचे सेवन ठरते लाभदायक 
विश्वसंचार

Milk benefits summer | उन्हाळ्यात ‘या’ कारणांसाठी दुधाचे सेवन ठरते लाभदायक

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली ः हिवाळ्यात दुधाचे सेवन आवर्जून केले जाते. मात्र, उन्हाळा सुरू झाला की अनेकजण ताक किंवा लस्सीला पसंती देतात. पण आयुर्वेदानुसार, उन्हाळ्यातही दुधाचे महत्त्व कमी होत नाही. रात्रीच्या वेळी कोमट दूध पिणे शरीरासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. दूध हे केवळ अन्न नसून ते एक उत्तम औषधही आहे. भारतीय परंपरेत दुधाला ‘पूर्णान्न’ मानले जाते. उन्हाळ्याच्या दिवसात शरीर थंड ठेवण्यासाठी आणि ऊर्जा टिकवण्यासाठी दूध पिणे फायदेशीर ठरते. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने दूध घेतल्यास त्याचे शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येतात.

दुधात काही विशिष्ट घटक मिसळल्यास त्याची शक्ती द्विगुणित होते, असे तज्ज्ञ सांगतात. त्यापैकी एक आहे हळद. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उन्हाळ्यात अगदी चिमूटभर हळद टाकून दूध प्यावे. या शिवाय महिलांच्या आरोग्यासाठी आणि त्वचेच्या तजेला टिकवण्यासाठी केशरयुक्त दूध उत्तम ठरते. शारीरिक कमकुवतपणा आणि हाडांच्या दुखण्यावर अश्वगंधा आणि दूध हे उत्तम मिश्रण आहे.

मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि शांत झोप लागण्यासाठी दालचिनीचे दूध गुणकारी आहे. ज्यांना वारंवार सर्दी-खोकल्याचा त्रास होतो, त्यांनी थोडे जायफळ टाकून दूध घ्यावे. यामुळे संसर्गापासून बचाव होतो, तर रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रित ठेवण्यासाठी दालचिनीचे दूध रामबाण उपाय मानले जाते. सौंदर्य आणि प्रजनन आरोग्य सुधारण्यासाठी केशर मिश्रित दुधाचा वापर करावा. दूध केवळ पोषण देत नाही, तर ते मनाला शांत करण्याचे कामही करते. शरीरातील त्रिदोष संतुलित ठेवण्यासाठी दुधाचा वापर प्रभावी ठरतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT