फणस खाण्याचे भरपूर फायदे आहेत  Pudhari File Photo
विश्वसंचार

कर्करोगास प्रतिबंध करण्यासही फणस गुणकारी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : फणसाचे गोड गरे खाणे कुणाला आवडत नाही? भारत, इंडोनेशियासह अनेक देशांमध्ये फणस आवडीने खाल्ला जातो. फणसाच्या गर्‍यांबरोबरच त्याच्या बियाही उकडून किंवा भाजी करून खाल्ल्या जातात. मात्र केवळ चवीसाठीच नव्हे, तर विविध पोषक घटकांसाठीही फणस महत्त्वाचा ठरतो. फणसातील काही पोषणतत्त्वांबद्दल जाणून घेऊ.

कर्करोग प्रतिबंधासाठी फणस औषधी

100 ग्रॅम फणसामध्ये दैनंदिन आवश्यकतेच्या 25 टक्के इतकं ‘क’ जीवनसत्त्व असतं. तसेच 15 टक्के इतकं पोटॅशियम असतं. सध्या विगन आहार पद्धती अवलंबिणार्‍यांसाठी कच्च्या फणसाची भाजी ‘विगन मीट’ म्हणजे मांसाहाराला पर्याय म्हणून खाल्ली जाते. फणसातील जॅकलिन आणि सॅपोनीन यामुळे कोणत्याही प्रकारच्या ट्युमरची वाढ होत नाही आणि कर्करोग प्रतिबंधासाठी देखील फणस औषधी मानला जातो. फणसातील ल्युटीन, झियाझानथिन, कॅरोटिनॉइड्स डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. किंबहुना, वयपरत्वे द़ृष्टी कमी होऊ नये म्हणून फणसाचे गरे आहारात असणे आवश्यक आहे.

मलावरोध रोखण्यासाठी फणस खाणे उपयुक्त

फणसात असणारे तंतुमय पदार्थ पाचक मानले जातात. मलावरोध रोखण्यासाठी फणस खाणे उपयुक्त ठरते. अनेकदा आहार नियमन करताना फणसाचे काप, गर्‍यांचे चिप्स खाण्याबद्दल प्रश्न विचारले जातात. फणस फळ म्हणून खाताना मिळणारे पोषक फायदे तळण्याच्या प्रक्रियेमध्ये साधारण शून्य होऊन जातात. फणसात असणारे ‘क’ जीवनसत्त्वाचं प्रमाण कमी होतं. व्यायाम करणार्‍यांसाठी उत्तम ऊर्जा देणार तसेच बर्‍याचअंशी ‘ब’ जीवनसत्त्वाचं अधिक प्रमाण असणारा फणस खेळाडूंसाठी मात्र अत्यंत उपयुक्त फळ आहे. ‘वेगन’ म्हणजेच वनस्पतीजन्य आहार करू इच्छिणार्‍यांसाठी फणस सगळ्याच पोषकतत्त्वांसाठी उत्तम पदार्थ आहे. फणसाच्या गर्‍यांचे त्यातील पाणी काढून तयार केले जाणारे पीठ, बियांपासून तयार केले जाणारे पीठ शाकाहारी आहारात पोषक मानले जाते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT