नवी दिल्ली : डोळे हा आपला महत्त्वाचा अवयव आहे. ही दुनिया आपण डोळ्यांच्या सहाय्यानेच पाहत असतो. सध्याच्या काळात डोळ्यांचे आरोग्य खराब करणारे अनेक कारके निर्माण झालेली आहेत. संगणक, मोबाईल आणि इतर डिजिटल उपकरणांच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांची द़ृष्टी अकाली कमकुवत होत आहे. याशिवाय सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळेही डोळ्यांचे नुकसान होत आहे. विशिष्ट आहारातून आपल्याला डोळ्यांचे आरोग्य सुधारता येऊ शकते असे तज्ज्ञ सांगतात. त्याची ही माहिती...
संत्री, लिंबू आणि इतर लिंबूवर्गीय फळे हे व्हिटॅमिन सीचे उत्कृष्ट स्रोत आहेत, जे डोळ्यांच्या पेशी मजबूत करतात आणि त्यांचे आयुष्य वाढवतात. हे फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी करून डोळे निरोगी ठेवतात. गाजरामध्ये ‘अ’ जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते जे डोळ्यांसाठी महत्त्वाचे आहे. गाजर डोळयातील पडदा मजबूत करते आणि मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करून डोळ्यांना दीर्घकाळ निरोगी ठेवते. कच्ची कोशिंबीर, रस किंवा हलक्या भाज्यांच्या स्वरूपात गाजराला आहारात समाविष्ट केले जाऊ शकते. रोज एक-दोन गाजरं खाल्ल्याने द़ृष्टी चांगली राहते. ब्राेकोली हे एक सुपरफूड आहे जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात झेक्सॅन्थिन आणि ल्युटीन नावाचे संयुक्त असतात. जे रेटिनाला मजबूत करतात. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे डोळ्यांच्या स्नायूंना निरोगी आणि मजबूत ठेवते.