ज्यूस 
विश्वसंचार

कोणत्या समस्येत कोणता ज्यूस चांगला?

त्वचा सुधारण्यासाठी 'ज्यूस' फायदेशीर

पुढारी वृत्तसेवा

होळीचा सण संपल्यानंतर खरा उन्हाळा सुरू होतो. उन्हाळ्यात अचानक तापमान वाढल्याने किंवा कमी झाल्याने अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. त्यातून बचाव करण्यासाठी तुम्ही काही ज्यूसचे सेवन करू शकता, असे तज्ज्ञ सांगतात. तर पाहूया, कोणत्या आजारावर कोणता ज्यूस फायदेशीर ठरू शकतो.

भूक कमी लागत असल्यास : सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिणे खूप फायद्याचे असते. तसेच आलं आणि सैंधव मीठ घेतल्याने भूक वाढते.

रक्त शुद्धी आणि त्वचा सुधारण्यासाठी : लिंबू, गाजर, बीट, पालक, तुळस, कडुलिंब, बेलाची पाने आणि कोबीचा रस पिऊन रक्त शुद्ध करता येते.

दम्याच्या रुग्णांसाठी : लसूण, आले, तुळस, बीट, गाजर आणि गोड द्राक्षांचा रस लाभदायक ठरतो.

उच्च रक्तदाबाचे रुग्ण : गाजर, द्राक्षे, मोसंबी आणि गहू गवताचा रस पिऊन रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो.

कावीळच्या रुग्णांसाठी : द्राक्ष, सफरचंद, रास्पबेरी आणि गोड लिंबाचा रस सर्वोत्तम आहे.

आम्लपित्तासाठी : गाजर, पालक, तुळस, द्राक्ष आणि गोड लिंबाचा रस फायदेशीर आहे.

अल्सर रुग्णांसाठी : गाजर, कोबी आणि द्राक्षांचा रस शरीराला आराम देतो.

सौंदर्य वृद्धीसाठी : नारळ पाणी आणि बाभळीच्या रसाचे सेवन त्वचेसाठी फायदेशीर आहे.

मुरुम कमी करण्यासाठी : गाजर, टरबूज, कांदा, तुळस आणि कोरफडीचा रस मुरुम कमी करण्यात मदत करतो.

कर्करोगाच्या रुग्णांसाठी : गहू गवत, गाजर आणि द्राक्षांचा रस फायदेशीर ठरतो.

मधुमेह रुग्णांसाठी : कारले, कोबी, पालक, नारळ आणि गाजराचा रस सर्वोत्तम आहे.

किडनी रुग्णांसाठी : काकडीचा रस खूप फायदेशीर आहे. या रुग्णांनी टोमॅटो खाणं टाळावे.

सर्दी आणि खोकल्यासाठी : मुळा, आले, लसूण, तुळस आणि गाजर यांचा रस पिऊन आराम मिळवता येतो.

ब—ाँकायटिससाठी : पपई, गाजर, आले, तुळस आणि अननसाचा रस फायदेशीर ठरतो.

वजन वाढवण्यासाठी : पालक, गाजर, बीट, नारळ आणि कोबीचा रस प्यावा.

वजन कमी करण्यासाठी : अननस, टरबूज, भोपळा आणि लिंबाचा रस प्रभावी आहे.

अशक्तपणा आणि थकवा : रात्री द्राक्षे, पालक, टोमॅटो, बीट आणि सफरचंद यांचा रस प्यावा.

मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी : द्राक्ष, अननस आणि रास्पबेरीचा रस फायदेशीर ठरतो.

डोकेदुखीपासून आराम मिळण्यासाठी : काकडी, बीट, गाजर आणि नारळाचा रस उपयुक्त ठरतो.

निद्रानाश : द्राक्ष आणि सफरचंदाचा रस मिसळून पिऊन आराम मिळवता येतो.

डायरिया : गहू गवत, गाजर, नारळ, काकडी आणि पालक यांचा रस फायदेशीर आहे.

मूळव्याधीवर उपचार : देशी गायीचे तूप मुळा आणि आल्याच्या रसात मिसळून प्यावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT