विश्वसंचार

अस्वलाने स्वतःला आरशात पाहिले आणि…

Arun Patil

नवी दिल्ली : मोटारसायकलीच्या आरशात स्वतःचे रूपडे न्याहाळणारी चिमणी किंवा दुकानाच्या दारातील आरशात निरखून पाहणारे एखादे माकड आपण पाहिलेले असते. मात्र, एखाद्या वन्यजीवाची अशावेळी काय प्रतिक्रिया होईल हे पाहणेही रंजक ठरू शकते. असाच एक प्रकार घडला असून त्याचा व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे. एका अस्वलाने स्वतःला आरशात पाहिले आणि त्याची जी प्रतिक्रिया दिसली ती पाहून अनेकांना गंमत वाटली!

जंगलात प्रयोग म्हणून कुणीतरी हा आरसा लावला होता. ज्यावेळी अस्वल अचानक आरशासमोर आले त्यावेळी जे झालं ते पाहण्यासारखेच होते. अस्वल स्वतःला आरशात पाहून चक्क घाबरले. आधी ते तेथून दूर पळाले आणि नंतर त्याने आरशावर हल्ला केला. आधी दचकलेल्या अस्वलाला जणू काही आपला कुणी तरी प्रतिस्पर्धी इथे असावा असे वाटले आणि त्याने या आरशावर हल्ला केला. हा आरसा जमिनीवर पडला आणि फुटला. त्याची ही गंमत पाहून लोकांचेही चांगले मनोरंजन झाले. काही लोक 'प्रँक' करतात तसाच हा अस्वलाबाबत केलेला 'प्रँक' होता!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT