Bangladesh Man Meru Mia | बांगला देशात २१ लग्ने करणारा ‘मेरू मियाँ’ ठरला चर्चेचा विषय 
विश्वसंचार

Bangladesh Man Meru Mia | बांगला देशात २१ लग्ने करणारा ‘मेरू मियाँ’ ठरला चर्चेचा विषय

पुढारी वृत्तसेवा

ढाका : बांगला देशातील मेरू मियाँ नावाच्या व्यक्तीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्यक्तीने तब्बल २१ विवाह केल्याचा दावा व्हिडीओच्या माध्यमातून केला जात आहे. विशेष म्हणजे, त्यांना स्वतःच्या सर्व पत्नींची नावेही सांगता आली नाहीत. या कथित प्रकारामुळे सोशल मीडियावर आश्चर्य, विनोद आणि प्रश्नांची चर्चा सुरू झाली आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये मेरू मियाँ याला त्‍याच्‍या पत्नींची नावे विचारण्यात आली. त्यावेळी त्याने शीला, नरगिस, सेलेना, आलिया, तारा, ज्योत्स्ना, राबिया आणि पारुल अशी आठ नावे सांगितली. मात्र, उर्वरित पत्नींची नावे त्यांना आठवली नसल्याचे व्हिडीओत दिसते. मेरू मियाँ हा भीक मागून उदरनिर्वाह करताेे. त्याच्या कथित म्हणण्यानुसार, त्याने कोणत्याही महिलेला लग्नासाठी स्वतःहून मागणी घातली नव्हती. महिलाच त्यांच्याशी विवाह करू इच्छित होत्या. काही महिला वयाने मोठ्या असूनही त्यांचे मन दुखवायचे नसल्याने आपण लग्नाला नकार दिला नाही.

रोज वेगवेगळ्या पत्नीसोबत भीक मागायला?

व्हायरल पोस्टमध्ये मेरू मियाँ याच्या पत्नीही त्‍याला कामात मदत करत असल्याचे सांगितले जाते. दररोज वेगवेगळी पत्नी त्याच्यासोबत भीक मागायला जाते आणि त्यातून कुटुंबाचा खर्च भागवला जातो, असा दावा आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्या मुलांची संख्या, विवाहांची पार्श्वभूमी आणि कुटुंबाच्या जीवनशैलीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. काही जणांनी विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काहींनी या दाव्यांच्या सत्यतेबाबत शंका व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT