न्यूयॉर्क : अमेरिकेत अलास्कामध्ये एका महिलेने विमानात बाळाला जन्म दिला. त्यामुळे तिने आपल्या या गोंडस बाळाचे नाव 'स्काय' असे ठेवले आहे! विमान आकाशात उड्डाण करीत असतानाच या 'स्काय' म्हणजेच 'आकाश' नावाच्या बाळाचा जन्म झाला.
क्रिस्टल हिक्स नावाच्या महिलेचे हे अपत्य आहे. ती 35 आठवड्यांची गर्भवती होती. प्रसूतीसाठी ती विमानातून रुग्णालयाकडे निघाली होती. ग्लेन्नालालेनहून ती अलास्काला जात होती. त्यावेळी मध्यरात्री एक वाजता तिला विमानातच प्रसूती वेदना सुरू झाल्या. विमानातच तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. क्रिस्टलने सांगितले, एका तासातच माझे बाळ जन्मले. सुरुवातीला मला धक्काच बसला होता, थोडं विचित्रही वाटले. मात्र, बाळाचा जन्म सुखरूपपणे झाला. क्रिस्टल आणि तिच्या बाळाला अलास्कातील रुग्णालयात हलवण्यात आले. हे बाळ मुदतीपूर्वीच जन्मलेले असल्याने त्याला आधी बि—दिंग मशिनवर ठेवण्यात आले होते. विमान 18 हजार फूट उंचीवर असताना ते जन्माला आले. मात्र, ते आकाशात जन्मले असे जन्मदाखल्यावर लिहिता येत नव्हते. त्यामुळे त्याच्या जन्माचे स्थान 'आँकरेज' असे लिहिण्यात आले आहे!