न्यूयॉर्क : उतारवयातील आयुष्य नेहमीच खास असते. यात मनुष्याकडे प्रचंड अनुभव असतो; पण तो अनुभव लागू करण्यासाठी आवश्यक ऊर्जा असत नाही. यामुळे, आयुष्यातील मनोरंजनाचे क्षण कमी होत जातात. अलीकडेच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, यात आश्चर्यकारक घटना घडली आहे. या व्हिडीओत एक ज्येष्ठ महिला आपल्या दाताने केक कापण्याचा प्रयत्न करताना दिसून येते. मात्र, आपले दात आपली साथ सोडणारे दात आहेत, याचा तिला विसर पडतो आणि पाहता पाहता तिची बत्तिशी पूर्ण बाहेर येते.
इन्स्टाग्रामवर व्हायरल हॉगवर असेच अफलातून व्हिडीओ पोस्ट केले जातात. त्यात हा नवा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ही महिला यावेळी आपल्या पूर्ण कुटुंबीयांसह हजर होती. वाढदिवस साजरा करत असताना उत्साहाचे वातावरण होते. जवळपास फॅमिली गेट टुगेदरचे या सोहळ्याला रूप मिळाले होते. आता कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रित असताना मस्ती तर होणारच; पण एक व्यक्ती यादरम्यान या ज्येष्ठ व्यक्तीचा चेहरा केकमध्ये बुडवू पाहते आणि याच प्रयत्नात त्या व्यक्तीची बत्तिशीच केकवर येते. या व्हायरल व्हिडीओेला आतापर्यंत 54 हजार व्ह्यूज मिळाले असून, त्या ज्येष्ठ व्यक्तीचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला होता.