वॉशिंग्टन : दुनिया रहस्याने भरलेली आहे. काही रहस्ये आपल्या नजरेसमोर येतात, तर अनेक ठिकाणं आणि त्यांच्या गोष्टी अजूनही माणसांच्या आवाक्याबाहेर आहेत. जगातील सर्वात मोठा प्रश्न कायम आहे, खरंच एलियन अस्तित्वात आहेत का? या गूढ प्रश्नाशी नाव घट्ट जोडलेले ठिकाण म्हणजे ‘एरिया 51’. अमेरिकेत नेवाडाच्या वाळवंटातील या परिसरात एलियनशी संबंधित घटना घडलेल्या असल्याचे म्हटले जाते. ही एलियनशी संबंधित संशोधनाची एक खुली प्रयोगशाळाच असल्याचेही म्हटले जाते.
अमेरिकेत दक्षिण नेवाडात एक छुपा लष्करी तळ आहे. लास वेगासपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या नेवाडा टेस्ट अँड ट्रेनिंग रेंजचा हा हिस्सा 1955 मध्ये उभारला गेला. दुसर्या महायुद्धाच्या काळात अमेरिकन वायुसेनेने या परिसराचा हवाई तोफखाना म्हणून वापर केला. त्यानंतरच्या दशकांत या तळाभोवती रहस्यांची आवरणं अधिकच दाटू लागली. स्थानिकांच्या मते, गेल्या काही वर्षांत येथे विचित्र प्रकाशरेषा, अनोखे आवाज आणि अज्ञात उडणार्या वस्तू (णऋज) दिसल्याच्या घटना वारंवार नोंदल्या गेल्या आहेत. सामान्य नागरिकांसाठी एरिया 51 पूर्णपणे बंद आहे. तिथे 24 तास कडक सुरक्षेचा पहारा असतो.
एखादी गाडी भरकटूनही या सीमारेषेपर्यंत आली, तरी काही क्षणांत सशस्त्र सैनिकांचा ताफा तिला थांबवतो. 1980 च्या सुमारास येथे कार्यरत असलेल्या एका कर्मचार्याने दावा केला की, अमेरिकन सरकारने हाती लागलेल्या एलियन यानाची तपासणी इथेच सुरू केली आहे आणि ही माहिती जगापासून लपवली जात आहे. याचमुळे जागतिक पातळीवर ‘एरिया 51’ची ओळख एलियन संशोधन केंद्र म्हणून पक्की झाली. गुप्तचर मोहिमांसाठी वापरल्या जाणार्या ण-2 या उच्च-उड्डाण क्षमतेच्या विमानाची चाचणीही याच परिसरात झाली.
इतर कोणत्याही विमानापेक्षा जास्त उंचीवर, रडारला चकवा देत उडणार्या ण-2 ची झेप लोकांना त्या काळात ‘उडत्या तबकड्या’सारखी वाटली. परिणामी णऋज च्या चर्चांना आणखी खाद्य मिळालं. अमेरिका सरकारनं आजवर एरिया 51बाबत तपशीलवार माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळे संशोधन, एलियन प्रयोग, की आणखी काही, खरं काय आहे, हे अद्याप रहस्यच आहे. मात्र, आधुनिक विज्ञान आणि अंतराळ मोहिमा वेग घेत असतानाच ‘एलियन आहेत का?’ या मूलभूत प्रश्नाचे उत्तर कदाचित याच वाळवंटाच्या कुठल्यातरी भूमिगत दालना लपवून ठेवलेले असू शकते.