Apple Vision Pro Team | ॲपलच्या व्हिजन प्रो टीमचे ‘मेटा’च्या नव्या चष्म्यावर लक्ष  
विश्वसंचार

Apple Vision Pro Team | ॲपलच्या व्हिजन प्रो टीमचे ‘मेटा’च्या नव्या चष्म्यावर लक्ष

पुढील पिढीच्या एआर हेडसेटबाबत अहवालातून मोठा खुलासा

पुढारी वृत्तसेवा

लंडन : ‘ॲपल’ जेव्हा जेव्हा एखादे नवीन उत्पादन बाजारात आणते, तेव्हा जगभरातील टेक-प्रेमी आणि चाहते त्याच्या पुढील व्हर्जनमध्ये (Next Generation) काय खास असणार, याचे अंदाज लावू लागतात. ‘ॲपल व्हिजन प्रो’बाबतही असेच घडताना दिसत आहे. ‘ब्लूमबर्ग’च्या मार्क गुरमन यांच्या एका नव्या अहवालामुळे ऍपलच्या मिक्स्ड-रिॲलिटी हेडसेटच्या भविष्यातील वाटचालीबाबतच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

मार्क गुरमन यांच्या अहवालानुसार, सध्या बाजारात असलेले ‘व्हिजन प्रो’ हे केवळ एका मोठ्या क्रांतीची सुरुवात आहे. ‘ॲपल’ भविष्यात स्वतंत्र ‘एआर ग्लासेस’ आणू शकते, असे अनेकांचे मत असले तरी या तंत्रज्ञानाचा विकास सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. सध्या कंपनी या उपकरणाच्या डिझाईन आणि अंतर्गत तंत्रज्ञानावर अधिक भर देत आहे. या अहवालात ‘N224’ या कोडनेमअंतर्गत पूर्णपणे नव्या स्वरूपात तयार केल्या जाणाऱ्या हेडसेटचा उल्लेख करण्यात आला आहे. ‘ॲपल’चे अभियंते सध्या या उपकरणाच्या विविध कॉन्सेप्ट्सवर काम करत आहेत. यात ‘मेटा’ कंपनीच्या नव्या उत्पादनांप्रमाणेच भागांची जुळवाजुळव आणि रचना करण्याच्या डिझाईनचा विचार केला जात आहे.

ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक हलके आणि खिशाला परवडणारे उपकरण तयार करणे गरजेचे आहे, याची ‘ॲपल’ला पूर्ण जाणीव आहे. मात्र, कंपनी सध्या नव्या दिशेने विचार करत असल्याने हे उत्पादन बाजारात येण्याची शक्यता सध्या तरी थोडी कमी आहे. हे उपकरण लाँच झालेच, तर ते २०२८ च्या शेवटी किंवा २०२९ पूर्वी बाजारात येण्याची शक्यता नाही. सध्या ‘ॲपल’चे वरिष्ठ अभियंते ही कॅटेगरी टिकवून ठेवण्यावर भर देत असल्याने कंपनी ‘डिस्प्ले नसलेल्या’ स्मार्ट ग्लासेसवर वेगाने काम करत आहे. दोन वर्षांच्या या विकास प्रक्रियेनंतर पुढील पिढीचे मॉडेल मॅक किंवा नवीन आयफोनच्या शक्तिशाली चिपसह बाजारात आणले जाऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT