विश्वसंचार

20 वर्षांमध्ये त्याने घरातच साकारली गुहा!

Arun Patil

श्रॉपशायर : एखादे परंपरागत टेरेस हाऊस असते, तसेच एक टेरेस हाऊस ते ही होते. दोन बेडरूम, एक लिव्हिंगरूम, एक गॅलरी किचन, अशीच त्याची सर्वसाधारण रचना. पण, अँटोनी या घरमालकाने 2 दशकात या घराचा मोठा कायापालट करत गुहा साकारली आणि इतके करत असताना त्याने याची अगदी शेजार्‍यांनाही कल्पना येऊ दिली नाही.

या घरमालकाने दोन दशकांच्या कालावधीत आतील बाजूस लँडस्केप बगीचाही साकारला आहे. आश्चर्य म्हणजे अँटोनीने यासाठी मजुरांची आणि कोणत्याही उपकरणांची सुद्धा मदत घेतली नाही. अँटोनीने जितकी घरे घेतली, त्या सर्वांचे सर्व इंटेरियर त्याने स्वत:च केले असल्याचे त्याच्या मुलाने याप्रसंगी सांगितले. कालांतराने अँटोनीचे निधन झाले. पण, त्याने साकारलेल्या कलाकृती अजरामर ठरल्या.

अँटोनींची बहुतांशी घरे शेजार्‍यांना त्रास होऊ नये, यासाठी त्याने साऊंडप्रूफ प्रणाली देखील बसवली. घरातील आतील बाजूला साकारलेल्या लँडस्केप बगिच्यात टोमॅटो, सफरचंद, अन्य भाजीपाला दिसून येते. हा बगीचा साकारताना त्याने येथे पूर्ण सूर्यप्रकाश येईल, याचीही तजवीज केली आहे.

SCROLL FOR NEXT