विश्वसंचार

जमिनीखाली बनवले अकरा खोल्यांचे घर!

Arun Patil

लखनौ : जमिनीखाली असणारी घरे काही देशांमध्ये पाहायला मिळतात. मात्र, आपल्या देशातही एका व्यक्तीने असे घर बनवले आहे. उत्तर प्रदेशातील या माणसाने जमिनीखाली दोन मजली घर बनवले असून त्यामध्ये अकरा खोल्या आहेत.

उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील या माणसाने हे घर बनवले आहे. अकरा खोल्यांचे हे घर बांधण्यासाठी त्याला बारा वर्षे लागली. या घरात जिने, बाल्कनी, खिडकी आणि मातीचे सोफा, टेबलही आहेत. या घराचा एक व्हिडीओही आता व्हायरल झाला आहे. या घरापर्यंत खाली जाण्यासाठी पायर्‍या आहेत. या पायर्‍यांवर बसण्यासाठी जागा आणि खुर्चीही आहे. एका बाजूला खिडकी आणि बाल्कनीही आहे.

खाली असलेल्या या घरात एक व्यक्ती मातीच्या सोफ्यावर बसलेली दिसते. त्याच सोफ्याजवळ मातीचे एक गोल टेबलही आहे. एका ओसाड जमिनीत हे घर बांधलेले आहे. घर बांधणार्‍या व्यक्तीने निवडणूक लढवली होती व ती हरल्यानंतर तो आपले घर सोडून या ओसाड जागेत राहायला आला होता असे समजते. घरात हवा व प्रकाश खेळता राहील याची नीट व्यवस्था आहे. एखाद्या खोल गुहेसारखीच त्याची रचना आहे.

SCROLL FOR NEXT