विश्वसंचार

विद्यार्थ्याने बनवली विजेवर चालणारी सायकल

Arun Patil

कोटा : सध्याचा जमाना इलेक्ट्रिक वाहनांचा आहे. इलेक्ट्रिक बाईक, कार किंवा स्कूटीबद्दल तुम्ही खूप ऐकले असेल. तसेच तुम्ही ते वापरलेही असेल, मात्र ही सर्व वाहने विद्यार्थ्यांच्या खिशाला अनुकूल नाहीत. याचे कारण त्यांची किंमत जास्त असते. त्यामुळे ते विकत घेण्यासाठी विद्यार्थी जास्त पैसे खर्च करू शकत नाहीत. मात्र, विद्यार्थ्यांना कोचिंगमधून वसतिगृहात जाण्यासाठी दुचाकी नक्कीच लागते. विद्यार्थ्यांच्या या गरजा लक्षात घेऊन कोटा येथील एका बारावी उत्तीर्ण तरुणाने एक खास विजेची सायकल तयार केली आहे. ही सायकल पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे आणि एक वेळा चार्ज केल्यावर सुमारे 80 किलोमीटर चालते.

सायकलची रचना करणार्‍या वीरेंद्र शुक्ला यांनी सांगितले की, या सायकलमध्ये इंटिग्रेटेड इलेक्ट्रिक मोटर आहे. वीज पुरवण्यासाठी ती वापरली जाते. सायकलमध्ये रिचार्जेबल बॅटरी बसवण्यात आली आहे. साधारणपणे ही सायकल 25 ते 30 कि.मी./ताशी वेगाने धावते. सायकल दैनंदिन कामांसाठी खूप चांगली आहे आणि जर सायकल इलेक्ट्रिक असेल तर ती चालवायला अधिक चांगली, तसेच खिशावर डिझेल-पेट्रोलचा भारही पडत नाही.

वीरेंद्र शुक्लाने सांगितले की, इलेक्ट्रिक सायकल एकवेळा फुल्ल चार्ज केल्यावर 70 ते 80 किलोमीटरपर्यंत चालते. तिला चार्ज करण्यासाठी फक्त दोन युनिट खर्च होतील. ही सायकल बनवण्यासाठी 25 हजार रुपये खर्च आला आहे. तसेच कोटामध्ये शिकण्यासाठी येणारे अनेक कोचिंग विद्यार्थी वसतिगृह आणि घरी जाण्यासाठी सायकल वापरतात. अशा परिस्थितीत अशी सायकल त्या विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.

SCROLL FOR NEXT