विश्वसंचार

अमेरिकेने एलियन्सना लपवून ठेवलंय?

Arun Patil

वॉशिंग्टन : अंतराळाबाबत बहुतेक प्रत्येकाला खूप कुतूहल असते. अंतराळात एलियन्स राहत असून, त्यांचं एक वेगळं विश्व आहे, असं कायमच बोललं जातं. पण, याबाबत अद्याप कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत. जगभरातील विविध वैज्ञानिकांकडून याबाबत संशोधन सुरू असून, नेहमीच काही ना काही बातम्या चर्चेत येत असतात. आता एका दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेने एलियन्सला लपवून ठेवलं असल्याचा दावा करण्यात येत आहे. अमेरिकेने एलियन्सला बंधक बनवलं असून, त्यांच्यावर लपून-छपून वेगवेगळे प्रयोग सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे.

अमेरिकेतील एरिया-51 हे अतिशय गुप्त ठिकाण असल्याचं सांगितलं जातं आहे. एरिया-51 मध्ये अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था असून, येथे कोणत्याही व्यक्तीला प्रवेश किंवा बाहेर जाण्याची परवानगी नाही. काही षड्यंत्र सिद्धांत धक्कादायक दावे करतात. एरिया-51 मध्ये अमेरिकेने एलियन्सना कैद केलं असून, त्यांच्यावर प्रयोग सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. एरिया-51 ही जागा अत्यंत गुप्त ठेवण्यात आली आहे, ज्याबद्दल अमेरिकेतील लोकांनाही माहिती नव्हती. अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने 2013 मध्ये पहिल्यांदा एरिया-51 बाबतची माहिती सार्वजनिक केली होती. अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने सांगितलं की, अमेरिकेतील दक्षिण नेवाडाच्या वाळवंटात 'एरिया 51' हे अमेरिकन हवाई दलाचं केंद्र आहे. पण, हे ठिकाण एलियन्स आणि यूएफओबद्दल नेहमीच चर्चेत असते. एलियन्सची माहिती लपवल्याचा आरोप अमेरिकेवर मागील बर्‍याच काळापासून होत आहे.

आता सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सीच्या एका माजी एजंटने एलियन्सबाबत मोठा दावा केला आहे. अमेरिका एलियन्सला बंधन बनवून त्यांच्यावर संशोधन आणि प्रयोग करत असल्याचा दावा या माजी 'सीआयए' अधिकार्‍याने केला आहे. एका माजी 'सीआयए' एजंटने मोठा गौप्यस्फोट करताना दावा केला आहे की, त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्याने अमेरिकेच्या एरिया-51 या ठिकाणाला भेट दिली. भेटीदरम्यान एलियन्स पाहिल्याचा दावा या एजंटने केला आहे. त्या व्यक्तीने दिलेल्या एका मुलाखतीत दुसर्‍याच जगातून आलेल्या परग्रही प्राण्याचं वर्णन केलं होतं. एका माजी 'सीआयए' एजंटने तर त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत असा दावा केला होता की, एरिया-51 हे ठिकाण अस्तित्वात असून, त्याने या ठिकाणाला भेट दिली होती आणि तिथे एलियन्स पाहिले होते.

या व्यक्तीने पहिल्यांदा 1998 आणि नंतर 2013 मध्ये दिलेल्या मुलाखतींमध्ये एरिया-51 या ठिकाणाबद्दल धक्कादायक दावे केले होते. नोव्हेंबर 2022 मध्ये, अनेक इंग्रजी न्यूज वेबसाईटस्नी त्या व्यक्तीने त्याच्या मुलाखतीत केलेल्या दाव्यांबाबत अहवाल प्रकाशित केला होता. त्यानंतर आजही जेव्हा-जेव्हा एरिया-51 ची चर्चा होते, तेव्हा त्या 'अज्ञात' माजी 'सीआयए' एजंटच्या खळबळजनक दाव्यांकडे लक्ष वेधलं जातं. या अज्ञात माजी सीआयए एजंटचा उल्लेख एजंट केवपर असा करण्यात आला होता. त्या व्यक्तीने दावा केला होती की, अमेरिकन सरकारला सापडलेल्या काही वस्तू पाहण्यासाठी त्याला एरिया-51 मध्ये नेण्यात आलं होतं.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT