Alzheimer's risk | अल्झायमरचा धोका विशिष्ट जनुकावर अवलंबून Nemes Laszlo
विश्वसंचार

Alzheimer's risk | अल्झायमरचा धोका विशिष्ट जनुकावर अवलंबून

नवीन संशोधनातून धक्कादायक खुलासा

पुढारी वृत्तसेवा

लंडन : स्मृतिभ्रंश (डिमेन्शिया) या आजाराचा सर्वात सामान्य प्रकार असलेल्या ‘अल्झायमर’वर उपचार शोधण्यासाठी शास्त्रज्ञ अनेक दशकांपासून प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत असे मानले जात होते की, हा आजार जीवनशैली आणि विविध जैविक घटकांचे एक गुंतागुंतीचे मिश्रण आहे. मात्र, जानेवारीमध्ये ‘नेचर’ या प्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका नवीन संशोधनाने या कल्पनेला छेद दिला आहे. या संशोधनानुसार, अल्झायमर होण्याचा धोका प्रामुख्याने ‘अपोलिपोप्रोटीन ई’ (अझजए) नावाच्या एका विशिष्ट जनुकावर (ॠशपश) अवलंबून असतो.

अभ्यासातील काही महत्त्वाचे निष्कर्ष असे : जनुकाची भूमिका : ज्यांच्याकडे या जनुकाचे ‘सुरक्षित’ प्रकार आहेत, त्यांना अल्झायमर होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. धक्कादायक वास्तव : जगातील तब्बल 99 टक्के लोकसंख्या या जनुकाचा किमान असा एक प्रकार वाहून नेतात, जो या आजाराला खतपाणी घालतो. जीवनशैलीचा प्रभाव : आहार किंवा व्यायाम यांसारखे जीवनशैलीचे घटक या धोक्याला थोड्या प्रमाणात कमी-जास्त करू शकतात; पण मूळ धोका हा जनुकीय संरचनेतच असतो.

या संशोधनामुळे अल्झायमरच्या उपचारात एक नवी आशा निर्माण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, जर ‘जीन थेरपी’च्या माध्यमातून ‘अझजए’ जनुकाला लक्ष्य केले, तर लाखो लोकांमध्ये अल्झायमरचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी करता येईल. जर हे यशस्वी झाले, तर ही जगातील सर्वात मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी पहिली ‘जीन थेरपी’ ठरू शकते. अल्झायमरसारख्या असाध्य आजारावर मात करण्यासाठी आता निसर्गाच्या या अंतर्गत ‘कोड’ला बदलण्याचे आव्हान शास्त्रज्ञांसमोर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT