नोव्हेंबरमध्ये पृथ्वीला धडकणार ‘एलियन्सचे यान’? 
विश्वसंचार

Alien Ship : नोव्हेंबरमध्ये पृथ्वीला धडकणार ‘एलियन्सचे यान’?

शास्त्रज्ञांकडून धक्कादायक माहिती समोर

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन ः एलियन्स म्हणजेच परग्रहवासी. हे मानवजातीसाठी आजही एक रहस्यमय आणि अनाकलनीय कोडे आहे. त्यांच्या अस्तित्वाबाबत अनेक दशकांपासून संशोधन सुरू आहे आणि यामध्ये काही आश्चर्यजनक बाबी समोर आल्या आहेत. नोव्हेंबर 2025 मध्ये ‘एलियन्स’ पृथ्वीवर हल्ला करू शकतात, असा दावा अलीकडेच शास्त्रज्ञांनी केला आहे. हा दावा का आणि कसा करण्यात आला? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

शास्त्रज्ञांनी दिलेल्या इशार्‍यानुसार, मॅनहॅटन शहराएवढ्या आकाराचा एक गूढ अंतराळ पिंड प्रचंड वेगाने पृथ्वीकडे येतंय. या पिंडाला 3 ख/ अढङअड असे नाव देण्यात आले आहे, ज्याला यापूर्वी अ11 श्रि3 न म्हणून संबोधले जात होते. हा लघुग्रहसद़ृश अवकाश पिंड एलियन्सच्या तंत्रज्ञानाचा भाग असण्याची शक्यता आहे. हा अंतराळ पिंड नोव्हेंबर 2025 मध्ये पृथ्वीच्या जवळ येईल, आणि यावेळी त्याची पृथ्वीशी टक्कर होण्याचा धोका असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. हा सनसनाटी दावा हार्वर्ड विद्यापीठाचे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ प्रोफेसर एवी लोएब आणि त्यांच्या संशोधन टीमने केला आहे. प्रो. लोएब हे तेच शास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी 2017 मध्ये आंतरतारकीय अंतराळात दिसलेल्या ‘ओमुआमुआ’ या विचित्र वस्तूला एलियन अंतराळयान असण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यांच्या नवीन अभ्यासानुसार, 3 ख/ अढङअड हा पिंड नोव्हेंबर 2025 च्या अखेरीस सूर्याच्या सर्वात जवळ येईल. यावेळी ते पृथ्वीच्या रडारपासून लपून राहण्याची शक्यता आहे, आणि याच संधीचा फायदा घेऊन ते पृथ्वीवर गुप्त हल्ला करू शकते, असा इशारा लोएब यांनी दिला आहे. 3 ख/ अढङअड, ज्याला काही तज्ज्ञांनी ‘एलियन अंतराळयान’ असेही संबोधले आहे. सर्वप्रथम चिलीमधील रियो हुर्ताडो येथील अढङअड (ईींशीेळव ढशीीशीीींळरश्र-ळारिलीं ङरीीं अश्रशीीं डूीींशा) दुर्बिणीतून दिसले. या पिंडाची रुंदी अंदाजे 10 ते 20 किलोमीटर आहे, आणि तो ताशी 60 किलोमीटरच्या प्रचंड वेगाने पृथ्वीकडे येत आहे. शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की, ही माहिती केवळ एक गृहीतक आहे, यावर पूर्ण विश्वास ठेवता येत नाही. तरीही, हा विषय इतका गंभीर आहे की त्यावर सखोल चर्चा आणि संशोधन आवश्यक आहे. जर हा सिद्धांत खरा ठरला, तर हे पृथ्वीसाठी एक प्रचंड संकट ठरू शकते. ‘आम्ही या पिंडाला एलियन तंत्रज्ञान मानत नाही, पण त्याची शक्यता नाकारता येत नाही. या पिंडाच्या गती आणि आकारामुळे त्याचा धोका गंभीर आहे. जर त्याने पृथ्वीशी टक्कर केली, तर त्याचे परिणाम विनाशकारी ठरू शकतात’, असे प्रो. लोएब आणि त्यांच्या टीमने सावधगिरीचा इशारा देताना म्हटले. या पिंडाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे, आणि येत्या काही महिन्यांत याबाबत अधिक माहिती उपलब्ध होईल, असे शास्त्रज्ञांनी नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT