Gmail AI Features | जी-मेलमध्ये एआयचा धमाका Pudhari File Photo
विश्वसंचार

Gmail AI Features | जी-मेलमध्ये एआयचा धमाका

आता ई-मेल्स वाचणे आणि लिहिणे होणार अधिक सोपे!

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : गूगलने आपल्या जगप्रसिद्ध जी-मेल सेवेत जेमिनीद्वारे संचालित नवीन एआय फीचर्स आणण्याची घोषणा केली आहे. यामुळे कोट्यवधी यूजर्सचा ई-मेल वापरण्याचा अनुभव आणि पद्धत पूर्णपणे बदलणार आहे.

अशी असणार महत्त्वाची नवीन फीचर्स :

एआय ओव्हरव्ह्यू : जेव्हा तुम्ही अनेक उत्तरांचे (थे्रडस) मोठे ई -मेल संभाषण उघडता, तेव्हा एआय तुम्हाला त्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांचा थोडक्यात सारांश (समरी) देईल. यामुळे तुम्हाला प्रत्येक ई-मेल वाचण्याची गरज पडणार नाही.

नवीन एआय इनबॉक्स : गूगल एका नवीन एआय इनबॉक्सची चाचणी घेत आहे. हा इनबॉक्स तुमच्या संपर्कातील महत्त्वाच्या व्यक्ती (व्हीआयपी) आणि कामाच्या ई-मेलना प्राधान्य देईल. उदाहरणार्थ, बिले भरणे किंवा डॉक्टरांची अपॉईंटमेंट यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी तो आपोआप हायलाईट करेल.

हेल्प मी राईट (मला लिहिण्यास मदत करा): हे टूल आता सर्व यूजर्ससाठी मोफत उपलब्ध करून दिले जात आहे. तुम्ही फक्त एखादा छोटा प्रॉम्प्ट (उदा. “सुट्टीसाठी अर्ज लिहा”) दिल्यास, एआय तुमच्यासाठी पूर्ण ई-मेल मसुदा तयार करून देईल.

सजेस्टेड रिप्लाय (सुचवलेली उत्तरे) : एआय आता संभाषणाचा संदर्भ समजून तुम्हाला उत्तरांचे पर्याय सुचवेल. हे पर्याय तुमच्या लिहिण्याच्या पद्धतीशी जुळणारे असतील.

कोणाला काय मिळणार?

सर्व यूजर्ससाठी : ई-मेल समरी, हेल्प मी राईट आणि सजेस्टेड रिप्लाय ही फीचर्स मोफत असतील.

पेड सबस्क्राइबर्ससाठी (गूगल एआय प्रो/अल्ट्रा) : इनबॉक्स क्वेश्चन्स (इनबॉक्सला प्रश्न विचारणे), प्रूफरीड (व्याकरण आणि टोन तपासणे) ही प्रगत फीचर्स केवळ पैसे देणार्‍या सदस्यांसाठी असतील.

डेटा प्रायव्हसी : गूगलने स्पष्ट केले आहे की, वापरकर्त्यांचा खासगी ई-मेल डेटा त्यांच्या एआय मॉडेल्सना प्रशिक्षित (टे्रन) करण्यासाठी वापरला जाणार नाही. हे सर्व एआय प्रोसेसिंग सुरक्षित आणि खासगी वातावरणात केले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT