‘एआय’ने उलगडले नष्ट झालेल्या 2 हजार वर्षे जुन्या ग्रंथाचे रहस्य Pudhari File Photo
विश्वसंचार

‘एआय’ने उलगडले नष्ट झालेल्या 2 हजार वर्षे जुन्या ग्रंथाचे रहस्य

अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे, अभ्यासक या ग्रंथाचे ‘व्हर्चुअल’ उलगडा

पुढारी वृत्तसेवा

लेक्झिंटन : जर्नल प्लॉस वन मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका क्रांतिकारी संशोधनात, संशोधकांनी जवळजवळ 2,000 वर्षे बंदिस्त आणि जळलेल्या एका प्राचीन ग्रंथाचा लेखक आणि शीर्षक शोधून काढले आहे. उच्च-रिझोल्यूशन स्कॅन आणि मशिन लर्निंगच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे, अभ्यासक या ग्रंथाचे ‘व्हर्चुअल’ उलगडा करण्यात यशस्वी झाले आहेत.

वेसुविअसच्या उद्रेकानंतर हरक्युलेनम हे शहर राख आणि खडकाळ खड्यांच्या थराखाली गाडले गेले. या ठिकाणी असलेल्या विला ऑफ द पपायरी या ग्रंथालयात अनेक दुर्मीळ आणि अमूल्य हस्तलिखिते सापडली, जी रोमन काळातील एकमेव वाचलेल्या साहित्यापैकी आहेत. या ग्रंथांच्या अवशेषांची स्थिती अत्यंत नाजूक आणि जळालेली असल्यामुळे, पारंपरिक पद्धतीने त्यांना उघडणे अवघड होते. त्यामुळे त्यांचे संरक्षण करताना त्यातील मजकूर समजून घेणे फार कठीण झाले होते.

एआय आणि इमेजिंग टेक्नॉलॉजीजमधील प्रगतीमुळे, आता हे ग्रंथ न उघडता वाचणे शक्य झाले आहे. 2015 मध्ये, शास्त्रज्ञांनी एन-गेदी साइटवरील एका ग्रंथाचा एक्स रे टॉमोग्राफी वापरून थ-ीडी व्हर्चुअल मॉडेल तयार केले आणि या नवकल्पनेची सुरुवात झाली. केंटकी विद्यापीठातील टीमने व्हॉल्युम कार्टोग्राफर नावाचा एक प्रोग्राम विकसित केला, जो मायक्रो-सीटी इमेजिंगच्या सहाय्याने जळालेल्या कागदावरील शाईच्या अति सूक्ष्म खुणा शोधतो.

एआयला या शाईच्या नमुन्यांची ओळख पटवण्यासाठी न्यूरल नेटवर्कचे प्रशिक्षण दिले गेले, ज्यामुळे ग्रंथांचे डिजिटल स्वरूपात ‘उलगडणे’ शक्य झाले. 2019 मध्ये या तंत्राची पहिली यशस्वी चाचणी झाली आणि त्यातून पुढील संशोधनाला चालना मिळाली. या ग्रंथाची ओळख पटल्यावर समोर आले की, तो ग्रंथ फिलोडेमस नावाच्या एक प्रसिद्ध एपिक्यूरियन तत्त्वज्ञाने लिहिला आहे.

या ग्रंथात, मनुष्याने सद्वर्तनाने जीवन कसे जगावे आणि दुर्वर्तनापासून दूर कसे राहावे याचा सखोल विचार आहे. हे लिखाण आजच्या ‘सेल्फ-हेल्प‘ प्रकारात मोडते आणि त्यातील नैतिक विचार आजच्या काळातही उपयुक्त वाटतात. फिलोडेमस हे एपिक्युरियन चळवळीतील एक प्रमुख विचारवंत होते, ज्यांनी सुखाच्या शोधात संयम आणि सोशिकतेचे महत्त्व अधोरेखित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT