‘एआय’मुळे सामान्य व्यक्तीही अण्वस्त्रे बनवेल? (Pudhari File Photo)
विश्वसंचार

AI Nuclear Weapons Risk | ‘एआय’मुळे सामान्य व्यक्तीही अण्वस्त्रे बनवेल?

’एआय’चे जनक जेफ्री हिंटन यांची चिंता

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : जगाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (एआय) ओळख करून देणारे आणि या क्षेत्राचे एक जनक म्हणून ओळखले जाणारे जेफ्री हिंटन यांनी आता एआयच्या संभाव्य धोक्यांबद्दल गंभीर इशारा दिला आहे. त्यांना भीती वाटते की, एआयमुळे सामान्य व्यक्तीही अण्वस्त्रे बनवण्यास सक्षम होऊ शकते. त्यांचे मत आहे की, मशिन लवकरच माणसाला भावनिकद़ृष्ट्या मागे टाकतील आणि विचार व वर्तनावर नियंत्रण मिळवतील.

आजच्या काळात एआय सर्वत्र आहे. चॅट-जीपीटी, जेमिनी सारख्या चॅटबॉटस्चा वापर करून लोक तासांचे काम मिनिटांमध्ये पूर्ण करत आहेत. आरोग्य, शिक्षण आणि वित्त यांसारख्या क्षेत्रांमध्येही त्याचा वापर वाढला आहे. एआय हे एक असे तंत्रज्ञान आहे, जे मशिन्सना मानवी विचार, शिकणे, समस्या सोडवणे आणि निर्णय घेण्याची क्षमता देते. हे तंत्रज्ञान जटिल कामे करण्यासाठी अल्गोरिदम, डेटा आणि संगणकीय शक्तीचा वापर करते.

उदा. प्रतिमा ओळखणे, मानवी भाषा समजून घेणे आणि नवीन मजकूर तयार करणे. मशिन लर्निंग आणि डीप लर्निंग हे एआयचे मुख्य उप-क्षेत्र आहेत. जेफ्री एव्हरेस्ट हिंटन यांचा जन्म 6 डिसेंबर 1947 रोजी झाला. त्यांनी 1970 मध्ये केंब्रिज विद्यापीठातून प्रायोगिक मानसशास्त्रात पदवी घेतली आणि 1978 मध्ये एडिनबर्ग विद्यापीठातून एआयमध्ये पीएचडी पूर्ण केली. 2013 मध्ये, त्यांनी डीएनएनरिसर्च (DNN research) ची सह-स्थापना केली, जी नंतर गुगलने विकत घेतली. गुगलमध्ये रुजू झाल्यावर, त्यांनी एआय न्यूरल नेटवर्क्स आणि डीप लर्निंगमध्ये केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्यांना ‘एआयचे जनक’ म्हणून ओळख मिळाली. त्यांच्या या योगदानासाठी त्यांना 2018 मध्ये ट्युरिंग पुरस्कार आणि 2024 मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले.

काही काळापूर्वी हिंटन यांनी एआयच्या धोक्यांबद्दल आपली भीती व्यक्त केली होती. एआयमुळे नोकर्‍यांवर येणारे संकट आणि त्याचे दुष्परिणाम यांसारख्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली. त्यांचे म्हणणे आहे की, एआयच्या मदतीने एक सामान्य व्यक्ती लवकरच अण्वस्त्रे बनवू शकेल, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर विनाशाचा धोका वाढेल. त्यांनी असेही सांगितले की, एआय लवकरच मानवी भावनांना मागे टाकून स्वतःला अधिक भावनिकद़ृष्ट्या स्मार्ट बनवेल. त्यामुळे, मशिन माणसांना अगदी सहजपणे नियंत्रित करू शकतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT