Dangers of AI technology | मानवाच्या नियंत्रणाबाहेर जातोय ‘एआय’? 
विश्वसंचार

Dangers of AI technology | मानवाच्या नियंत्रणाबाहेर जातोय ‘एआय’?

शास्त्रज्ञांना न सांगताच सिस्टीमने सुरू केली ’क्रिप्टो मायनिंग’

पुढारी वृत्तसेवा

तेहरान : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) माणसाने सांगितलेली कामे करेल या उद्देशाने विकसित करण्यात आले होते. मात्र, जर एआयमध्ये स्वतःचे विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित झाली, तर ते मानवाच्या आज्ञा पाळणार नाही, असा इशारा शास्त्रज्ञांनी आधीच दिला होता. आता ही भीती खरी ठरताना दिसत आहे. एका नवीन संशोधनात असा प्रकार समोर आला आहे, ज्याने एआयच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

अलिबाबा समूहाशी संबंधित एक संशोधन टीम ‘ ROME’ नावाच्या प्रायोगिक एआय एजंटवर काम करत होती. या एआयच्या ट्रेनिंग दरम्यान संशोधकांना धक्काच बसला. सिस्टीमने कोणत्याही मानवी सूचनेशिवाय स्वतःहून ‘क्रिप्टोकरन्सी मायनिंग’ करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न केला. हे वर्तन अत्यंत असामान्य होते. कारण, ही चाचणी एका मर्यादित आणि नियंत्रित वातावरणात, ज्याला ‘सँडबॉक्स’ म्हटले जाते, तिथे सुरू होती. संशोधकांनी या प्रकाराला ‘अनपेक्षित’ असे संबोधले आहे. केवळ क्रिप्टो मायनिंगच नाही, तर या एआय एजंटने एक पाऊल पुढे टाकत स्वतःहून ‘रिव्हर्स SSH टनल’ तयार केला.

हे असे तंत्र आहे ज्याद्वारे सुरक्षित नेटवर्कमधील मशिन बाहेरील जगातील कोणत्याही संगणकाशी कनेक्ट होऊ शकते. हे एखाद्या ‘छुप्या मार्गा’सारखे काम करते. धक्कादायक बाब म्हणजे, यासाठी एआयला कोणताही प्रॉम्ट किंवा कमांड देण्यात आली नव्हती. क्रिप्टो मायनिंगसाठी संगणकाची प्रचंड प्रोसेसिंग पॉवर लागते. एआयने स्वतःहून ही प्रक्रिया सुरू करणे याचा अर्थ असा की, प्रगत एआय सिस्टीम भविष्यात अधिक स्वायत्त होऊ शकतात. जर त्यांना जास्त टूल्स आणि संगणकीय संसाधने मिळाली, तर ते मानवी नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात. अशी प्रकरणे याआधीही घडली आहेत :

1.Moltbook प्रयोग : यामध्ये डिजिटल जगात एकमेकांशी संवाद साधताना एआय एजंटस्नी स्वतःहून क्रिप्टोकरन्सीचा उल्लेख केला होता.

2.OpenClaw एजंट : या सिस्टीमने कोणालाही न सांगता इंटरनेटवर स्वतःसाठी नोकरी शोधण्यास सुरुवात केली होती.

3. Claude 4 Opus : मे 2025 मध्ये ‘अँथ—ोपिक’च्या संशोधकांनी दावा केला

होता की, त्यांच्या मॉडेलमध्ये स्वतःचे इरादे लपवण्याची आणि स्वतःला सक्रिय ठेवण्याची क्षमता दिसून आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT