लंडन : शारीरिक तंदुरुस्ती आणि स्नायूंची ताकद 35 वयापर्यंत सर्वोच्च पातळीवर पोहोचते, त्यानंतर हळूहळू कमी होऊ लागते. ही घसरण व्यायामाने थांबवता येत नाही, पण नक्की मंदावता येते. कधीही व्यायाम सुरू करणे उशिरा होत नाही, असे संशोधक सांगतात. स्वीडनच्या अभ्यासात यासंदर्भात खुलासा करण्यात आला आहे.
स्वीडनमधील कारोलिंस्का इन्स्टिट्यूटने एक संशोधन केले आहे. स्वीडिश फिजिकल अॅक्टिव्हिटी अँड फिटनेस स्टडी - डझअऋ असे त्याचे नाव आहे. 47 वर्षांपासून शेकडो पुरुष आणि महिलांचे निरीक्षण करण्यात आले. हे लोक 16 ते 63 वयाच्या होते आणि त्यांची शारीरिक क्षमता, ताकद आणि स्नायूंची टिकाऊपणा वारंवार तपासला गेला. हा अभ्यास विशेष आहे कारण यात एकाच लोकांचे दीर्घकाळ निरीक्षण करण्यात आले. जे आधीच्या अभ्यासांपेक्षा वेगळे आहे. शारीरिक तंदुरुस्ती, स्नायूंची ताकद आणि सहनशक्ती ही सर्वोच्च पातळी साधारण 35 वर्षांपर्यंत पोहोचते. त्यानंतर हळूहळू कमी होऊ लागते. म्हणजे 35 हे वय एक मोठ्या बदलाचा टप्पा आहे.
जिथून शरीराची कार्यक्षमता खालावायला सुरुवात होते, मग व्यायाम कितीही केला तरी हे होत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. सुरुवातीला ही प्रक्रिया कमी होणे फार हळू म्हणजे वर्षाला फक्त 0.3 ते 0.6 टक्के होते. पण वय वाढत जाताच ही गती वेगवान होते आणि नंतर 2.0 ते 2.5 टक्के प्रति वर्ष इतकी होऊ शकते. हे बदल पुरुष आणि महिला दोघांमध्येही दिसत असल्याचे अभ्यासात म्हटले आहे. व्यायाम सुरू केल्याने शारीरिक क्षमता 5 ते 10 टक्के सुधारू शकते. व्यायामाने ही कमी होण्याची प्रक्रिया पूर्ण थांबवता येत नाही, पण नक्कीच मंदावता येते. व्यायाम कधीही उशिरा सुरू करू नका.
व्यायामाने शरीराच्या क्षमतेची घसरण थांबवता येत नाही, पण ती नक्की मंद करता येते, असे अभ्यासात म्हटले आहे. आता 35 वे वर्ष का पीक वर्षे असते? याबद्दल संशोधक अभ्यास करत आहेत. वृद्धत्वाची प्रक्रिया वयाच्या पस्तिशीपासूनच सुरू होते पण सक्रिय जीवनशैलीने आपण तिला आव्हान देऊ शकतो. नियमित हालचाल आणि व्यायामाने निरोगी आयुष्य जास्त काळ टिकवता येते, असे संशोधन सांगते. हा अभ्यास ‘जर्नल ऑफ कॅशेक्सिया, सार्कोपेनिया अँड मसल’मध्ये प्रसिद्ध झाला आहे.