प्रकाशाचा वापर करून डेटा प्रोसेस करणारा अद्ययावत क्वांटम संगणक Pudhari File Photo
विश्वसंचार

प्रकाशाचा वापर करून डेटा प्रोसेस करणारा अद्ययावत क्वांटम संगणक

ही जगातील पहिली फोटोनिक क्वांटम संगणक प्रणाली आहे

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : शास्त्रज्ञांनी प्रकाशाचा वापर करून डेटा प्रोसेस करणारा एक क्रांतिकारी क्वांटम संगणक विकसित केला आहे, जो नेटवर्किंग वातावरणात आणि सामान्य तापमानावर कार्य करू शकतो. नवीन प्रणालीचे नाव ‘ऑरोरा’ असून, ही जगातील पहिली फोटोनिक क्वांटम संगणक प्रणाली आहे, जी मोठ्या प्रमाणावर ऑपरेट करू शकते. हा संगणक फायबर ऑप्टिक केबल्सद्वारे एकमेकांशी जोडलेल्या अनेक मॉड्यूल्सवर आधारित आहे. ही प्रणाली क्वांटम संगणनातील सर्वात मोठ्या अडचणींवर उपाय शोधते. विशेषतः स्केलेबिलिटी, फॉल्ट टॉलरेन्स आणि एरर करेक्शन (त्रुटी सुधारणा), असे या संगणकाचे निर्माते झॅनाडू यांनी सांगितले.

हा शोध भविष्यात उच्च फॉल्ट टॉलरेन्स आणि कमी त्रुटी दर असलेल्या क्वांटम डेटा सेंटर्सच्या निर्मितीला चालना देऊ शकतो, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. ‘नेचर’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, झॅनाडूचे संस्थापक आणि सीईओ क्रिश्चियन वीडब्रूक म्हणाले, ‘क्वांटम संगणकाच्या कामगिरीत सुधारणा (त्रुटी सुधारणा आणि फॉल्ट टॉलरेन्स) आणि स्केलेबिलिटी (नेटवर्किंग) ही उद्योग क्षेत्रासाठी उरलेली दोन मोठी आव्हाने आहेत. ‘परंपरागत क्विबिटस् म्हणजेच सुपरकंडक्टिंग क्विबिटस् क्वांटम संगणकांची मूलभूत घटक असतात आणि डेटा वेगाने प्रक्रिया करण्याची क्षमता त्यांच्यात असते. मात्र, हे क्विबिटस् मायक्रोवेव्ह सिग्नल्सचा वापर करून डेटा प्रक्रिया करतात, ज्यामुळे हार्डवेअर गरम होते आणि नुकसान होऊ शकते. यासाठी वापरण्यात येणार्‍या शीतकरणाच्या पद्धती संगणक जवळपास ‘अविनाशी’ शून्य (-2730उ) तापमानावर आणतात, पण यामुळे हार्डवेअर खराब होण्याचा धोका वाढतो आणि मशिनमध्ये प्रवेश कठीण होतो. त्याच वेळी, ऑरोरा ही प्रणाली पारंपरिक मायक्रोवेव्ह-आधारित किंवा सुपरकंडक्टिंग क्विबिटस्ऐवजी प्रकाशावर आधारित फोटोनिक क्विबिटस् वापरते. झॅनाडूच्या टीमने नेटवर्क केलेल्या फोटोनिक चिप्सद्वारे प्रकाश-आधारित प्रणाली तयार केली, जी फायबर ऑप्टिक तंत्रज्ञानामुळे सहज कनेक्ट केली जाऊ शकते. ‘ऑरोरा’चे विकासक असा दावा करतात की, क्वांटम संगणकाचे छोटे आणि कमी त्रुटी असलेले घटक परस्परजोड करून त्रुटी सुधारणा अधिक प्रभावी केली जाऊ शकते. त्यामुळे, नेटवर्किंग-आधारित क्वांटम संगणनाचा नवा मार्ग प्रशस्त होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT