विश्वसंचार

100 दिवस खोल पाण्यात राहण्याचे स्वीकारले चॅलेंज

Arun Patil

फ्लोरिडा : अशा काही आव्हानात्मक गोष्टी अशा असतात की ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. मात्र, काही लोक अशी आव्हाने स्वीकारण्यास मागे पुढे पाहात नाहीत. उदाहरणार्थ, अंतराळात वर्षांनुवर्षे राहणे, जिथे गुरुत्वाकर्षण नाही, किंवा आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असलेल्या काही गोष्टींशिवाय जीवन जगणे.

एक अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक चॅलेंज फ्लोरिडाच्या जो दितुरी नामक व्यक्तीने स्वीकारले आहे. तो या आता दोन ते चार तास नव्हे तर 3 महिने 10 दिवस पाण्याखालील जगात राहणार आहे. यास त्याने एक मार्चपासून सुरुवातही केली आहे. ही व्यक्ती केवळ व्यक्ती नाही तर साऊथ फ्लोरिडा युनिव्हर्सिटीची प्रोफेसर आहे. एका प्रयोगाअंतर्गत त्यांनी हे अवघड चॅलेंज स्वीकारले आहे. त्यांनी ठरवले आहे की 100 दिवस पाण्याखाली राहून आपल्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो, हे या प्रयोगातून पाहणार आहे.

जो दितुरी असे या प्राध्यापकांचे नाव असून त्यांनी गेल्या 1 मार्चपासून या अनोख्या प्रयोगास सुरुवात केली आहे. डॉक्टर डीप सी म्हणून ते सोशल मीडियावर हजर असून त्यांनी तेथील प्रयोगाची माहिती दिली आहे. 3 महिने समुद्र हेच आपले घर असेल आणि सागरी पर्यावरणाला पुनरुज्जीवित करण्यासाठी मी हा असा प्रयोग करत असल्याचे त्याने सांगितले आहे. डेली स्टारने दिलेल्या माहितीनुसार, जो दितुरी यांनी बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी केली आहे आणि आता ते वैद्यकीय तंत्रज्ञानामध्ये संशोधन करत आहेत, ज्यामुळे अनेक रोगांवर उपचार करता येतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT