विश्वसंचार

घर असतानाही कारमध्ये राहणारी महिला!

Arun Patil

लंडन : ज्या लोकांकडे स्वत:चे घर असत नाही, अगदी भाडेही भरण्याची ऐपत नसते, अशा लोकांना नाईलाजाने रस्त्यावर संसार थाटण्याशिवाय पर्याय नसतो. पण, एखादी व्यक्ती घरदार असतानाही स्वत:च्या इच्छेने कारमध्ये, तेही आपल्या पाळीव प्राण्यांसह राहत असेल, तर आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. स्टेफनी नावाची महिला सोशल मीडियावर 'हिप्पी गर्ल' म्हणून विशेष प्रसिद्ध असून याच महिलेने हा कारनामा केला आहे.

'द सन वेबसाईट'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, स्टेफनी या महिलेकडे टेस्ला कार असून या कारमध्येच ती आपल्या पाळीव प्राण्यांसह राहते. आता असेही नाही की, या महिलेकडे घर नाही. तिच्याकडे अपार्टमेंट आहे. पण, तिने स्वेच्छेने ते घर सोडले आणि कारमध्ये राहू लागली. राहण्याचे स्वातंत्र्य असावे, यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे ती म्हणते. केवळ एकाच जागी राहण्यास मन तयार होत नाही, असे तिने यावेळी स्पष्ट केले.

सोशल मीडियावर तिने आपल्या कारचे व्हिडीओ पोस्ट केले असून त्यात तिने कार कशी सजवली आहे, याचा प्रत्यय येतो. पाळीव प्राण्यांना लागणार्‍या सर्व गोष्टी या कारमध्ये समाविष्ट असून पाणी व पॅक फूडदेखील ती कारमध्ये ठेवते. कारमध्ये तिने झोपता येईल, अशी सोय केली असून दुसर्‍या भागात तिने किचनशी संलग्न बाबी ठेवल्या आहेत.

आता कारमध्ये शॉवर, वॉशरूम करणे शक्य नव्हते. त्यामुळे ती यासाठी सार्वजनिक वॉशरूम, जिम, स्पा सेंटर, मॉलचा विनियोग करून घेते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT