File Photo
विश्वसंचार

चारशे आलिशान गाड्यांचा मालक असलेला श्रीमंत केशकर्तनकार!

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : कोणत्याही व्यक्तीमध्ये यशस्वी होण्याची इच्छा असेल, तर तो काहीही करू शकतो. आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात श्रीमंत न्हाव्याबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या यशाची कहाणी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. ते लहानपणापासून अनेक अडचणींना तोंड देत मोठे झाले. आई-वडिलांच्या मृत्यूच्या वेळी ते खूपच लहान होते आणि त्यांचे कुटुंब गरिबीशी झुंजत होते. मात्र, त्यांनी हार मानली नाही. केशकर्तनाचा कौटुंबिक व्यवसाय त्यांनी सुरू केला; मात्र त्यावरच ते थांबले नाहीत. आपल्या कल्पकतेमुळे ते आता मोठे व्यावसायिक झाले असून, त्यांच्याकडे चारशे आलिशान गाड्या आहेत.

बंगळूरचे रहिवासी असलेले हे रमेश बाबू भारतातील सर्वात श्रीमंत नाभिक आहेत. रमेश बाबूंकडे अनेक आलिशान गाड्यांचं कलेक्शन आहे, ज्यात रोल्स रॉयस घोस्ट, मर्सिडीज-बेंझ, ऑडी इत्यादी गाड्या आहेत. खरे तर, रमेशबाबूंना नेहमीच जग जिंकायचे होते. रमेशने आपल्या कामात स्वतःला झोकून दिले होते. त्यांनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक गोष्टी केल्या. सर्वप्रथम त्याने 1994 मध्ये मारुती ओम्नी खरेदी केली आणि नंतर त्यांनी गाडी भाड्याने देण्याचा व्यवसाय वेगाने वाढवला. त्यांनी महागड्या कार खरेदी करून त्या भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला आणि पुन्हा कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांनी मर्सिडीज ई क्लास सेडान, रोल्स रॉयस घोस्ट, जग्वार, मर्सिडीज मेबॅक, बीएमडब्ल्यू आणि इतर अनेक आलिशान कार खरेदी केल्या. एवढ्या मोठ्या यशानंतरही ते आपल्या मुळांना विसरले नाहीत. ते आजही आपल्या मुळाशी जोडलेले आहेत. खरं तर, इतके श्रीमंत आणि अब्जाधीश असूनही, ते त्यांच्या सलूनमध्ये बराच वेळ घालवतात. ते स्वत: त्यांच्या ग्राहकांना हेअर स्टाईल करून आजही त्यांच्यातील केशकर्तनकार जिवंत ठेवतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT