ढेकणाची एक प्रजाती बनली 20 हजार पट अधिक धोकादायक Pudhari File Photo
विश्वसंचार

ढेकणाची एक प्रजाती बनली 20 हजार पट अधिक धोकादायक

जपानमधील संशोधकांनी ढेकणाच्या एका प्रजातीमधील धक्कादायक म्युटेशनचा छडा

पुढारी वृत्तसेवा

टोकियो : कोरोना महामारीच्या काळात लोकांना ‘जीन्स म्युटेशन’ बाबतची माहिती मिळाली होती. अनेक जीवाणू-विषाणूंपासून मोठ्या सजीवांपर्यंत असे जनुकीय उत्परिवर्तन होत असते. या म्युटेशनच्या सहाय्याने अनेक सूक्ष्म जीवांपासून ते किड्यांपर्यंतचे जीव अधिक धोकादायक बनत असतात. अशा म्युटेशनमधून त्यांनी संरक्षणात्मक ‘ढाल’ स्वतःमध्ये विकसित केलेली असते. आता जपानमधील संशोधकांनी ढेकणाच्या एका प्रजातीमधील अशाच धक्कादायक म्युटेशनचा छडा लावला आहे. या प्रजातीमधये 729 वेळा म्युटेशन झाले असून त्यामुळे हे ढेकूण वीस हजार पट अधिक धोकादायक बनले आहेत.

या म्युटेशनमुळे आता हे ढेकूण कीटकनाशकांपासून स्वतःचा बचाव करण्यास समर्थ झाले आहेत. त्यांचे कवच आता अधिक जाड बनले आहे. त्यामुळे साधारण कीटकनाशक किंवा स्प्रेचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही. हिरोशिमा युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा सुपरबग शोधला आहे जो पायरेथरॉईडस् म्हणजेच कीटकनाशकाबाबत 20 हजार पट अधिक प्रतिरोधक क्षमता ठेवणारा आहे. या नव्या संशोधनामुळे आता त्याचा नायनाट करण्यासाठी अधिक प्रभावी औषध बनवण्यास चालना मिळू शकते. ढेकूण हे माणसामध्ये थेटपणे एखादा गंभीर आजार फैलावत नाहीत, मात्र त्यांच्या चाव्याने रॅशेस, खाज किंवा सामान्य इन्फेक्शन होऊ शकते. ढेकणांचा बंदोबस्त करणे हे अतिशय कठीण काम असते. याचे कारण मादी ढेकूण एकावेळी पाच अंडी देते आणि संपूर्ण जीवनकाळात 500 ते 700 अंडी घालू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT