विश्वसंचार

एलियनसारखा दिसणारा सात भुजांचा ऑक्टोपस

Arun Patil

वॉशिंग्टन : अमेरिकेत वॉशिंग्टन राज्याच्या किनारपट्टीलगतच्या समुद्रात एका पाणबुड्याने विचित्र दिसणार्‍या ऑक्टोपसचे फोटो टिपले आहेत. हा 'ऑक्टोपस' असला तरी त्याला आठ नसून सातच भुजा आहेत. शिवाय त्याचे रंगरूप एखाद्या एलियनसारखेच दिसते. असा ऑक्टोपस आपल्या जीवनातील बहुतांश काळ हा खोल पाण्यातच घालवतो. या ऑक्टोपसवर काही जखमाही दिसून आल्या. त्यावरून असे आढळले की अलीकडेच त्याच्यावर एका कूकीकटर शार्कने हल्ला केला होता.

वॉशिंग्टनमधील अंडरवॉटर फोटोग्राफर एरिक अस्किल्सरड यांनी 8 सप्टेंबरला या ऑक्टोपसची कॅनेडियन सीमेजवळ सॅलिश समुद्रात फोटो टिपले. त्यावेळी हा फोटोग्राफर टंग पॉईंट नावाच्या ठिकाणी डायव्हिंग करीत होता. पाण्याखाली दहा फूट खोलीवर त्याला हा ऑक्टोपस आढळून आला. विचित्र दिसणारा हा ऑक्टोपस 3 फूट लांबीचा होता.

आपल्या भुजा खाली सोडून हा पाण्यात तरंगत होता असे एरिकने सांगितले. हा कोणत्या प्रजातीचा ऑक्टोपस आहे हे त्याला कळेना. त्यामुळे त्याने या ऑक्टोपसचे फोटो वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील मरीन बायोलॉजिस्ट ग्रेगरी जेन्सन यांच्याकडे पाठवले. त्यांनी हा सात भुजांचा 'हेलिफ्रोन अटलांटिकस' असे वैज्ञानिक नाव असलेला ऑक्टोपस असल्याचे सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT