विश्वसंचार

मागील दोन पायांवर उभा राहणारा रोबो कुत्रा

Arun Patil

वॉशिंग्टन : संशोधकांनी आता चार पायांचा एक विशेष रोबो विकसित केला आहे. एखाद्या श्वानासारखा दिसणारा हा रोबो मीरकॅटसारखा मागील दोन पायांवर उभा राहू शकतो हे विशेष! या रोबो डॉगचे नाव 'लोकोमॅन' असे आहे. हा रोबो अनेक कामांसाठी वापरला जाऊ शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

क्वाड्रूपेडल रोबो म्हणजेच चतुष्पाद रोबो हे बहुतेक वेळेला एखाद्या कुत्र्यासारखेच दिसतात. बोस्टन डायनॅमिक्सचा'स्पॉट' रोबोही असाच दिसतो. एखाद्या खडतर ठिकाणीही असे रोबो श्वान वेगाने चालू शकतात. त्यांच्यामध्ये बहुतांशी 'लो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी' हे वैशिष्ट्य असते. काही चतुष्पाद रोबोंना वेगवेगळ्या कारणांसाठी किंवा आधारासाठी अतिरिक्त दोन पायही दिलेले असतात. त्यामुळे खरे तर ते सहा पायांचे रोबो ठरतात. मात्र हा नवा 'लोकोमॅन' अतिशय वेगळा आहे.

तो आपल्या चार पायांचा चालताना खुबीने उपयोग करतोच, शिवाय प्रसंगी मागील दोन पायांवर उभाही राहू शकतो. हा रोबो अनेक कामे करू शकतो. एखादी वस्तू पकडू शकतो किंवा उभे राहून घराचा दरवाजाही उघडू शकतो. कॉर्नेल युनिव्हर्सिटीचे डिंग झाओ यांनी सांगितले की आम्हाला बुद्धिमान व कुशल रोबो निर्माण करायचे आहेत, केवळ मानवाची नक्कल करणारे रोबो नको आहेत!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT