Coding Technology | कोडिंगचा नवा ‘राजा’ आला समोर! पण मालक कोण? 
विश्वसंचार

Coding Technology | कोडिंगचा नवा ‘राजा’ आला समोर! पण मालक कोण?

जाणून घ्या, Ox Alpha ची संपूर्ण इनसाईड स्टोरी

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ च्या जगतात सध्या एकच नाव हादरवून सोडत आहे, ते म्हणजे ‘ऑक्स अल्फा’ (Ox Alpha.) OpenRouter प्लॅटफॉर्मवर कोणतीही मोठी पत्रकार परिषद न घेता, ब्रँड नाव न छापता आणि कोणत्याही अधिकृत लोगोशिवाय एक मॉडेल अचानक लाँच झाले. याला ‘‘Stealth Model’’ (गुप्त मॉडेल) म्हणून श्रेणीबद्ध करण्यात आले आहे. जेव्हा डेव्हलपर्सनी पहिल्यांदा याची चाचणी घेतली, तेव्हा या मॉडेलचा काम करण्याचा वेग, अचूकता आणि तर्कक्षमता (Logical Reasoning) पाहून ते अवाक झाले. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या ‘एआय’च्या मागे कोणती टेक कंपनी किंवा संशोधन प्रयोगशाळा आहे, हे अद्याप कोणालाही माहिती नाही. Ox Alpha ला OpenRouter वर पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे.

OpenRouter च्या अधिकृत माहितीनुसार, हे एक प्रगत ‘‘रीझनिंग मॉडेल’’ (Reasoning Model) आहे, ज्याची रचना कठीण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, दीर्घ कोडिंग प्रोजेक्ट्स आणि व्हिज्युअल-टेक्स्टच्या जटिल कामांसाठी करण्यात आली आहे. ‘OpenCode’ या ओपन-सोर्स ‘एआय’ कोडिंग एजंटने सोशल मीडियावर उघड केले की, Ox Alpha अमर्याद वापरासह एका आठवड्यासाठी मोफत राहील. सर्वात चक्रावणारी बाब म्हणजे याची क्षमता. याच्या डेव्हलपर्सकडे दररोज १०० ट्रिलियन टोकन्स प्रोसेस करण्याची पायाभूत सुविधा आहे.

हा आकडा इतका प्रचंड आहे की, ‘व्हिसा’ कंपनीद्वारे एका संपूर्ण महिन्यात वापरल्या जाणाऱ्या टोकन्सपेक्षा सुमारे १०० पटीने जास्त आहे. जेव्हा बाजारात नवीन ‘एआय’ मॉडेल येते, तेव्हा दिग्गज त्याची तातडीने पारख करतात. ‘स्ट्राईप’चे ‘सीईओ’ पॅट्रिक कॉलिजन यांनी स्वतः Ox Alpha ला अनेक कठीण टास्क देऊन तपासले. चाचणीनंतर त्यांनी ‘X’ (ट्विटर) वर सार्वजनिकपणे पोस्ट करत लिहिले, ‘‘हे खरोखरच अत्यंत प्रभावी आहे.’’ पॅट्रिक कॉलिजन यांच्यासारख्या जागतिक टेक लीडरची मोहर लागल्यानंतर टेक कम्युनिटीमध्ये अधिकच खळबळ उडाली आहे. आता लोक केवळ याचे फीचर्स वापरत नसून, याच्या खऱ्या मालकाचा शोध घेण्यातही गुंतले आहेत.

चीनच्या Z.ai लॅबचा गुप्त डाव?

या रहस्यमयी मॉडेलबाबत इंटरनेटवर दोन मोठ्या थिअरी (तर्क) सुरू आहेत.

पहिली आणि सर्वात लोकप्रिय थिअरी : हे चीनच्या एका नामांकित ‘एआय’ लॅबचे काम आहे. टेक मॅगझिन Wccftech च्या वृत्तानुसार, हा चिनी कंपनी ‘Z.ai’चा प्रकल्प असण्याची शक्यता आहे, ज्यांनी नुकतेच ‘GLM-5’ मॉडेल तयार केले होते. Z.ai ने याआधीही आपल्या मॉडेलची गुप्त चाचणी ‘‘Pony Alpha’’ नावाने केली होती. जेव्हा डेव्हलपर्सनी Ox Alpha च्या प्रतिसाद देण्याच्या पद्धतीचा आणि ‘टोकनायझर बिहेवियर’चा सखोल अभ्यास केला, तेव्हा त्याचे स्वरूप Pony Alpha शी तंतोतंत जुळत असल्याचे स्पष्ट झाले.

दुसरा पैलू : याचे धागेदोरे Microsoft शी जोडलेले आहेत का? : या कथेत ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा Wccftech ने आणखी एक विश्लेषण समोर आणले. काही स्वतंत्र संशोधकांचा असा दावा आहे की, Ox Alpha चे टोकनायझर बिहेवियर मायक्रोसॉफ्टच्या ‘MAI’ (Microsoft AI) फॅमिलीशी मिळतेजुळते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT