विश्वसंचार

तंबूतच व्यवसाय थाटणारा अवलिया!

Arun Patil

वर्साव : काही लोक असे काही भन्नाट करून जातात की, ज्यावर विश्वास ठेवणे देखील कठीण असते. असाच एक कारनामा एका अवलियाने केला असून व्यसनाधिनतेमुळे ससेहोलपट झाल्यानंतर यातून मार्ग काढण्यासाठी त्याने शून्यातून सुरुवात केली. मात्र, यातून मार्ग काढण्याची त्याची पद्धत मात्र अनोखीच ठरली.

'डेली स्टार'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, पोलंडचा रहिवासी असलेल्या मॅसेज फ्लँकला ड्रग्ज घेण्याची सवय लागली होती. या व्यसनात त्याने होते ते सारे गमावले. त्याच्याकडे राहण्यासाठी घरही बाकी राहिले नाही. पण, त्याने जिद्द सोडली नाही. त्याने एका पीडित ठिकाणी राहण्याचा तंबू बनवला व नंतर चक्क तेथेच आपला व्यवसायही थाटला.

आपल्या टेंटमध्ये त्याने गार्डन चेअरपासून टीशर्ट, लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस, शूज व खेळणी विकण्यास सुरुवात केली. आता तंबूत व्यवसाय कोणीही थाटू शकेल. पण, यातील वेगळेपण, आश्चर्य म्हणजे, या सर्व वस्तू त्याला एक तरी दान म्हणून मिळाल्या होत्या किंवा कचर्‍याच्या ढिगार्‍यातून! आता आपण सुस्थितीत असून रोजच्यासारखा तणाव असत नाही आणि आपण निसर्गाशीदेखील जोडून राहिल्याचा आनंद मिळतो, असे तो म्हणतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT