विश्वसंचार

चक्क साबणाच्या मदतीने हलवली भव्य इमारत!

Arun Patil

टोरांटो : हल्ली एखादे जुने झाड किंवा इमारत विकासकामांच्या मार्गात आली तर त्यांना पाडण्याऐवजी अन्यत्र हलवण्याची सोय निर्माण झालेली आहे. जगभरात अनेक ऐतिहासिक इमारती, घरे अन्यत्र हलवलेली आहेत. अगदी भारतातही इमारतींचे स्थलांतर झाले आहे. आता कॅनडातील नोव्हा स्कॉशियामध्ये याबाबतचा एक अनोखा प्रकार घडला आहे. तिथे चक्क साबणाच्या मदतीने तब्बल 220 टन वजनाची इमारत दुसरीकडे हलवण्यात आली. या स्थलांतराचा एक व्हिडीओही समोर आला आहे.

कॅनडातील हॅलिफॅक्समधील ही इमारत सन 1826 मध्ये बांधण्यात आली होती. कालांतराने या इमारतीचे व्हिक्टोरियन एल्मवूड हॉटेलमध्ये रूपांतर झाले. आता ही जुनी इमारत पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, रिअल इस्टेट कंपनी गॅलेक्सी प्रॉपर्टीजने ही इमारत नवीन ठिकाणी हलवण्याची योजना आखली. कंपनीने ज्या पद्धतीने ही संपूर्ण इमारत हलवली, ते खरोखरच आश्चर्यजनक आहे.

एस रश्टन कन्स्ट्रक्शन फर्मच्या टीमने सुमारे 700 साबणांच्या मदतीने हे हॉटेल नवीन ठिकाणी हलवले. कंपनीचे मालक शेल्डन रश्टन यांनी सांगितले की, रोलर्स वापरण्याऐवजी त्यांनी रोलरच्या आकाराचे साबण वापरले. हे साबण अतिशय मऊ होते, ज्यामुळे इमारत सरकवण्यास मदत झाली. अशा साबणांच्या मदतीने ही इमारत 30 फूट दूर हलवण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT