विश्वसंचार

गाजर खाणारा महाकाय किडा!

Arun Patil

वेलिंग्टन : जगातील सर्वात मोठा, वजनदार किडा कोणता आहे हे तुम्हाला माहिती आहे का? अलीकडेच असा किडा प्रसिद्धीच्या झोतात आला असून तो तीन सामान्य उंदरांपेक्षाही अधिक वजनदार आहे. या महाकाय किड्याचे नाव आहे 'वेटा'. त्याला किड्यांच्या बाबतीत 'हेवीवेट चॅम्पियन' म्हटले जात आहे. 71 ग्रॅम वजनाचा हा किडा गाजरही फस्त करतो!

गाजर हे या किड्याचे मनपसंत खाद्य आहे. सशाला जसे गाजर आवडते तसे या किड्यालाही गाजरच आवडते. त्याचे गाजर खात असतानाचे एक छायाचित्र सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. मार्क मोफेट या फोटोग्राफरने हे छायाचित्र टिपले. हे छायाचित्र शेअर करीत यूजरने म्हटले की 'जायंट वेटा' हा जगातील सर्वात वजनदार किडा आहे. त्याचे वजन 71 ग्रॅम असून ते उंदरापेक्षा तिप्पट अधिक आहे. हा किडा गाजर खातो. हे छायाचित्र मार्क मोफेट यांनी टिपले आहे'.

या पोस्टला आतापर्यंत 2 लाख 67 हजारांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच 1.6 हजार पेक्षा अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. हा किडा न्यूझिलंडचा असल्याचे मानले जाते. अशा प्रकारचे किडे आता नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचेही सांगितले जाते. तो 17.5 सेंटीमीटर म्हणजेच 7 इंच लांबीचा असू शकतो. एखाद्या चिमणीपेक्षाही अधिक वजनाचा हा किडा आहे. 'वेटा' हा शब्द माओरी भाषेतून घेतला आहे. त्याचा अर्थ 'कुरुप वस्तूंची देवता'. हा किडा एक शाकाहारी जीव असून तो बहुतांशी पाने खात असतो. मात्र कधी कधी तो छोटे किडेही खातो. त्याची शिकार बनवणारे अनेक जीव असल्याने आता त्यांची संख्या कमी होत आहे.

SCROLL FOR NEXT