विश्वसंचार

आठवड्यातून केवळ दोन तास उघडले जाणारे जंगल!

Arun Patil

इस्लिंग्टन : जगभरात प्रचंड वनसंपदा आहे आणि त्याबद्दल मानवाला बरेच औत्सुक्य रहात आले आहे. एरवी, जगभरात दोन प्रकारची जंगले असतात. यातील पहिल्या प्रकारातील जंगलात प्रवेश करण्यासाठी कोणतेही निर्बंध असत नाहीत आणि दुसर्‍या प्रकारातील जंगलात मानवाला अजिबात प्रवेश दिला जात नाही. याचे कारण असे की, अशा प्रकारच्या जंगलात प्रवेश करणे सुद्धा धोकादायक ठरू शकते.

लंडनमध्ये मात्र शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात असे एक जंगल आहे, जे आठवड्यातून फक्त दोन तासांसाठी उघडले जाते आणि बाकी वेळी तिथे अजिबात प्रवेश दिला जात नाही! बेन्सबरी वूडस हे इस्लिंग्टननजीक वसलेले छोटेसे नेचर रिझर्व्ह आहे. पूर्वी हा भाग खासगी पार्क म्हणून ओळखला जात असे. इस्लिंग्टन काऊन्सिलने याबाबत असे म्हटले आहे की, बेन्सबेरी वूड इथे लपलेला एक हिरा आहे. 28 वर्षांपूर्वी हे ठिकाण लंडनचे छोेटे नेचर रिझर्व्ह म्हणून नावारूपास येत राहिले आहे.

बेन्सबरी वूडसची मालकी एकेकाळी तत्कालीन खासदार जॉर्ज थॉर्नहिलकडे होती, पण नंतर दुरवस्थेमुळे त्याकडे दुर्लक्ष झाले होते. यातील काही वस्तू 1852 पासूनचे आहेत. ही जमीन नंतर लंडन बॅरो ऑफ इस्लिंग्टनने 1974 मध्ये विकत घेतली. पुढे काही प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, त्यात अपेक्षित यश आले नाही व ती योजनाही बारगळली. लंडनमधील हे छोटेसे जंगल केवळ 0.35 एकर जागेत वसलेले आहे. मात्र, या कमी क्षेत्रातील वनसंपदा मात्र लक्षवेधी असून त्यात लेडी बर्ड, स्टॅग बीटल्स मोठ्या प्रमाणात आढळून येत आले आहेत.

SCROLL FOR NEXT