Lapis lazuli | सोन्या-चांदीपेक्षाही महागडा रंग! 
विश्वसंचार

Lapis lazuli | सोन्या-चांदीपेक्षाही महागडा रंग!

पुढारी वृत्तसेवा

लंडनः रंग हे फक्त होळीमध्ये उधळण्यासाठी किंवा सजावटीसाठी वापरले जाणारे घटक नाहीत. इतिहासात रंगांना संस्कृती, धर्म, कला आणि सत्तेचे प्रतीक मानले गेले आहे. काही रंगांची किंमत तर सोने-चांदीपेक्षाही जास्त होती. अशाच रंगांमध्ये सर्वात महत्त्वाचे नाव आहे लॅपिस लाझुली. या मौल्यवान दगडापासून तयार होणारा ‘अल्ट्रामरीन’ निळा रंग. असे म्हटले जाते की शुद्ध आणि नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या अल्ट्रामरीनच्या एका ग्रॅमची किंमत 80 हजार रुपयांपेक्षाही जास्त जाऊ शकते. मग हा रंग इतका महाग आणि खास का मानला जातो? जाणून घेऊया.

लॅपिस लाजुली हा एखादा साधा रंग नसून एक अर्ध-मौल्यवान दगड आहे. त्याचा रंग गडद, चमकदार निळा असतो आणि त्यात सोनेरी ठिपके दिसतात. हे ठिपके ‘पायराइट’ या खनिजामुळे तयार होतात ज्यामुळे हा दगड तारकांनी भरलेल्या आकाशासारखा भासतो. इतिहासकारांच्या मते, लॅपिस लाजुलीच्या सर्वात प्राचीन खाणी अफगाणिस्तानातील बदख्शान प्रदेशात होत्या. हजारो वर्षांपूर्वी येथून हा दगड इजिप्त, मेसोपोटामिया आणि नंतर युरोपमध्ये पोहोचला.

‘अल्ट्रामरीन’ हा शब्द लॅटिनमधील ‘अल्ट्रामाराइन्स’ या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ ‘समुद्राच्या पलीकडून आलेला’ असा होतो. कारण, हा दगड युरोपमध्ये उपलब्ध नव्हता आणि तो आशियातून आयात करावा लागत असे. त्यामुळे त्याची किंमत प्रचंड जास्त होती. मध्ययुगीन युरोपमध्ये या दगडापासून शुद्ध निळा रंग काढण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आणि वेळखाऊ होती. दगड बारीक करून, विविध रसायनांसोबत आणि तेलांबरोबर अनेक टप्प्यांत शुद्धीकरण केल्यानंतरच खरा निळा पिगमेंट तयार होत असे. त्यामुळे त्याचा अगदी छोटा भागही अत्यंत महाग पडत असे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT