विश्वसंचार

अन् त्या महिला कारचालकाने चक्क पोलिसालाच उडवले!

Arun Patil

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील एक व्हिडीओ पाहिला तर श्वास थांबल्याशिवाय राहणार नाही. कारण, येथे प्रचंड वेगामुळे नियंत्रण सुटलेल्या एका कारने चक्क एका पोलिस अधिकार्‍यालाच उडवले. केवळ सुदैवानेच या अधिकार्‍याला किरकोळ दुखापतीशिवाय आणखी काहीही झालेले नाही.

या व्हिडीओनुसार, एक महिला कार चालवत होती आणि समोर पोलिस अधिकार्‍याला पाहताच तिचा राग अनावर झाला आणि तिने आपल्या कारचा वेग आणखी वाढवत त्या पोलिस अधिकार्‍याला उडवण्यात कसर सोडली नाही.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तेथेच उपस्थित असलेल्या आणखी एका पोलिसाने हा व्हिडीओ केल्याचे सांगण्यात आले आहे. ही घटना पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये घडली असल्याचे पोलिस खात्याने यावेळी नमूद केले. एक महिला वेगात गाडी चालवत होती. तिला थांबवल्यानंतर ती पोलिस अधिकार्‍यांशी वाद घालताना दिसली. पुढे ती घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न करताना जो पवित्रा घेते, तो मात्र धक्कादायक असाच होता.

ती महिला अधिकार्‍यांशी भांडताना आणि वेगवान गाडीबद्दल दिलेल्या चलनाबद्दल तिचा राग व्यक्त करताना दिसत आहे. त्यावेळी या महिलेच्या कारसमोर एक पोलिस अधिकारी उभा राहिलेला दिसत आहे. ही महिला आधी या अधिकार्‍याला बाजूला व्हायला सांगते, पण तो अधिकारी जेव्हा बाजूूला होत नाही, तेव्हा मात्र ही महिला थेट आपली गाडी सुरू करते आणि पोलिस अधिकार्‍याला उडवते. नशिबाने या पोलिस अधिकार्‍याचा जीव वाचतो, पण त्यांना थोडी दुखापत झाली आहे. व्हिडीओत असे दिसून आले की, या महिलेने पोलिस अधिकार्‍याला लांबवर फरफटत नेले होते. व्हायरल व्हिडीओ फेसबुकवर 66,000 हून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT