जिम एरिंगटन File Photo
विश्वसंचार

92 वर्षांचा बॉडीबिल्डर!

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : वय म्हणजे केवळ एक आकडा असतो, बाकी काही नाही, असे दाखवणारे अनेक वृद्ध लोक सध्याच्या काळात पाहायला मिळतात. चाळीशी गाठल्यावरही ज्यांचे नेत्र पैलतीराला लागतात, अशा हताश लोकांसाठी हे वृद्ध स्त्री-पुरुष प्रेरणादायी ठरत असतात. वृद्धापकाळातही आपली तंदुरुस्ती कायम ठेवणार्‍या अनेक लोकांच्या प्रेरणादायी कथा आहेत. फिटनेससाठी कोणतीही वयाची मर्यादा नाही. व्यायाम, योग हा फक्त तरुण मुलांनीच करावा असा अनेक जणांचा गैरसमज आहे.

‘पद्मश्री’ने सन्मानित 101 वर्षे वयाच्या फे्रंच योगशिक्षिका शर्लोट चोपिन या वयातही स्वतः योगासने करतात व इतरांनाही शिकवतात. जिममध्ये जाऊन व्यायाम करणारेही अनेक वृद्ध स्त्री-पुरुष पाहायला मिळतात. सध्या अशाच एका 92 वर्षांच्या बॉडीबिल्डरचे नाव चर्चेत आले आहे. हा वृद्ध व्यक्ती अमेरिकेतील आहे. त्यांचे नाव जिम एरिंगटन. या व्यक्तीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी जिम एरिंगटन व्यायाम करतात आणि पिळदार शरीरयष्टीचे प्रदर्शनही करतात.

या आजोबांनी 2015 मध्ये वयाच्या 83 व्या वर्षी जगातील सर्वात वयस्कर बॉडीबिल्डर म्हणून प्रथम गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये प्रवेश केला. ( याआधी 104 वर्षांचा आणि 72 वर्षांपूर्वी मिस्टर युनिव्हर्सचा किताब पटकावणारा भारतीय माणूस होता. मात्र, त्यांचे निधन झाले आहे. त्यांचे नाव ‘मनोहर ऐच’ असे होते.) वयाच्या 92 व्या वर्षी देखील ते अजूनही मजबूत आहेत. 1 सप्टेंबर 1932 रोजी जन्मलेल्या जिम एरिंगटन यांना मुलांनी शाळेत खूप त्रास दिला. यामुळे त्यांना फिटनेस अ‍ॅक्टिविटी करायला प्रवृत्त केले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या वेबसाईटनुसार, जिम एरिंगटन यांचा जन्म हा दीड महिने आधी झाला होता. तेव्हा त्याचे वजन 2.5 किलो होते. यावेळी त्याच्या पालकांनी जिम एरिंगटनला वाचवण्यासाठी प्रचंड संघर्ष केला होता. हा अत्यंत अस्वस्थ मुलगा होता. जो नेहमी आजारी पडायचा. 1947 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी व्यायाम करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून त्याने मागे वळून पाहिले नाही. त्याच्या स्वतःच्या शब्दात, त्याला सुपरहिरो व्हायचे होते. जिम एरिंगटन सध्या आठवड्यात फक्त तीन वेळा जिममध्ये जातात. दोन तास जिम करतात. मशरूम आणि इतर आरोग्यदायी पदार्थ खाऊन जिम एरिंगटन आपल्या आहाराची काळजी घेतात. ते आता पाच दशकांहून अधिक काळ बॉडीबिल्डर आहेत. त्यांनी अनेक स्पर्धा, शो जिंकले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT