विश्वसंचार

खर्च केले 3 हजार, मिळवले 796 कोटी रुपये!

Arun Patil

बीजिंग : 'भगवान देता है तो छप्पर फाडके' असे का म्हणतात, याचा प्रत्यय चीनमधील एका व्यक्तीला अलीकडेच आला. एक छोटासा व्यवसाय करणार्‍या या माणसाला भन्नाट कल्पना सुचली. यातून त्याने फक्त तीन हजार रुपये गुंतवून त्याने इतके पैसे कमवले की ते मोजणेही कठीण ठरले. या व्यक्तीला तीन हजार रुपयांच्या बदल्यात 796 कोटी 22 लाख 63 हजार 904 रुपये मिळाले आणि खर्‍या अर्थाने क्षणार्धात त्याचे नशीब फळफळले.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, या तरुणाचे वय 28 वर्षे आहे. त्याने 680 मिलियन युआन म्हणजेच 796 कोटी 22 लाख 63 हजार 904 रुपयांची लॉटरी जिंकली. चीनच्या इतिहासात लागलेली ही सर्वात मोठी लॉटरी आहे. हा तरुण गुझोऊ प्रांतातील रहिवासी आहे. चायना वेल्फेअर लॉटरीने दिलेल्या वृत्तानुसार, या व्यक्तीने लॉटरीची एकूण 133 तिकिटे खरेदी केली होती. त्यापैकी एका तिकिटाची किंमत दोन युआन म्हणजेच 23 रुपये होती.

सर्व तिकिटांची किंमत तीन हजार रुपयांपेक्षा थोडी जास्त झाली. त्याला प्रत्येक तिकिटावर 5.16 मिलियन युआन म्हणजेच 725,000 डॉलर्स (भारतीय चलनात 6,01,42,520 रुपये) बक्षीस मिळाले. आयकर नियमांनुसार, या व्यक्तीला त्याच्या एकूण बक्षीस रकमेपैकी एक पंचमांश रक्कम कर म्हणून सरकारकडे जमा करावी लागेल. इतके असूनही त्याच्याकडे इतके पैसे शिल्लक असतील की त्याच्या अनेक पिढ्या काहीही काम न करता बसून खाऊ शकतील. या व्यक्तीचं म्हणणं आहे की, रात्री मोबाईलवर लॉटरी जिंकल्याची माहिती मिळाली, बक्षीस रक्कम कळाली व त्यानंतर केवळ झोप उडणे बाकी होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT