Elderly Groom Young Bride Case | सत्तर वर्षांचा दुल्हा, 22 वर्षांची दुल्हन! 
विश्वसंचार

Elderly Groom Young Bride Case | सत्तर वर्षांचा दुल्हा, 22 वर्षांची दुल्हन!

पुढारी वृत्तसेवा

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये सध्या एक ‘हटके लग्न’ खूप चर्चेत आले आहे. त्याची सोशल मीडियावर धूम सुरू आहे. 70 वर्षांच्या हकीम बाबर यांनी या उतार वयात निकाह केला आहे. त्यांची पत्नी अवघ्या 22 वर्षांची आहे. एकीकडे मुली मिळत नसल्याने अविवाहित तरुणांची मोठी फौज तयार होत असताना बाबर यांनी मात्र या वयातही नशीब काढल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अर्थात, उलटसुलट चर्चांना या नवरीने उत्तर दिले आहे. आपल्यावर लग्नासाठी कुणाचाही दबाव नसल्याचे तिने म्हटले आहे.

पाकिस्तानी वृत्तसंस्था ‘ट्रिब्युन’नुसार, पत्रकार जेव्हा बाबर यांच्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांनी आणि पत्नीने वय हा केवळ आकडा असल्याचा दावा केला. निकाह, दोघांचा खासगी विषय आहे, वयाच्या अंतराचा कोणताही विषय दोघांमध्ये नाही, असे त्यांनी सांगितले. हकीम बाबर याने सांगितले की, दोघांचे लग्न हा प्रेमविवाह आहे. दोघेही एकमेकांना ओळखत होते. त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावर कमेंटचा पाऊस पडला आहे. 70 व्या वर्षी लग्न करण्यावरून बाबर यांच्यावर टीका होत आहे. त्यावेळी मनुष्याचे मन तरुण हवे, बाकी सगळ्या वायफळ चर्चा असल्याचे बाबर म्हणाले. त्यांची पत्नी ही घटस्फोटीत आहे आणि तिने हा निकाह योग्य आणि वैध असल्याचा दावा केला आहे.

बाबर यांच्या मते लपून संबंध ठेवण्यापेक्षा त्यांनी उघडपणे लग्न करण्याचा निर्णय घेतला, त्यात चुकले काय, त्यांनी समाजाच्या दुटप्पीपणावर निशाणा साधला आहे. दोष देण्यापेक्षा आमच्या दोघांच्या निर्णयाचा सन्मान करावा, असे मत त्यांनी मांडले. पत्नीने बाबर यांचे समर्थन केले आहे. दोघांचे एकमेकांवर खरं प्रेम आहे. त्यामुळे वयाचा मुद्दा गौण असल्याचे ती म्हणाली. जर तुमची काळजी करणारी व्यक्ती असेल, तर मग लग्न करण्यास उशीर करू नये. मी तेच केले. समाज माध्यमावर आम्हाला काय ट्रोल करण्यात येत आहे, याच्याशी मला काही देणे घेणे नसल्याचे ती म्हणाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT