वॉशिंग्टन : अमेरिकेतील हेज फंडचे मॅनेजर पॉल पॉल्सन हे वयाच्या 65 व्या वर्षी प्रेमात पडले आहेत. ते 33 वर्षीय तरुणीशी सध्या डेट करत आहेत. पॉल्सन यांची वयाची तीशी पार केलेली गर्लफ्रेंड एलिना डी अल्मेइडा ही इन्स्टाग्रामवर डायटिशियन गुरू आहे. दरम्यान, पॉल्सन यांची यांनी सुमारे 21 वर्षे विवाह बंधनात राहिल्यानंतर रोमानियन पत्नीशी घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. 65 व्या वर्षी अब्जाधीश पडला तरुणीच्या प्रेमात पडले आहेत.
पेज सिक्सच्या माहितीनुसार पॉल्सन हे नवी गर्लफ्रेंड एलिनाशी यावर्षीच्या उन्हाळ्यात भेटले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अब्जाधीश पॉल्सन व एलिना यांना हॅम्पटन परिसरात अनेकवेळा पाहण्यात आले आहे.
दरम्यान, असेही म्हटले जात आहे की, अमेरिकी हौसिंग मार्केटवर डाव लावणार्या पॉल्सन यांच्या संपत्तीत लवकरच घट होऊ शकते.
एलिना ही हेल्थ गुरू असून ती आपल्या इफेक्टिव्ह लाईफ स्टाईलची मालकीन आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 1 लाख 36 हजार फॉलोअर्स आहेत. सूत्रांनी असेही सांगितले की, पॉल्सन व एलिना यांच्यातील प्रेम हे सुरुवातीच्या टप्यात आहे. मात्र, दोघेही अत्यंत खूश आहेत.
पॉल्सन यांनी आपल्या पत्नीशी घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. घटस्फोटानंतर या कथित प्रेमाचा खुलासा होऊ शकतो.
दरम्यान, पत्नीशी झालेल्या मतभेदामुळे घटस्फोट घेत असल्याचे पॉल्सन यांनी म्हटले आहे. पॉल्सन व त्यांच्या पत्नी 15 वर्षांपासून विभक्त राहत आहेत.