विश्वसंचार

फ्लोरिडात सापडले 60 लाख वर्षांपूर्वीच्या हत्तींचे अनेक अवशेष

Arun Patil

न्यूयॉर्क : अमेरिकेत उत्तर फ्लोरिडामध्ये करण्यात आलेल्या एका उत्खननात संशोधकांना हत्तींची जणू काही दफनभूमीच सापडली आहे. तिथे तब्बल 60 लाख वर्षांपूर्वीच्या हत्तींचे अवशेष मिळाले. हे हत्ती आधुनिक हत्तींचे पूर्वज असलेल्या 'गॉम्फोथेरेस' कुळातील हत्तींचे आहेत.

फ्लोरिडा म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री येथील क्युरेटर जॉनथन ब्लोच यांनी सांगितले की हा एक महत्त्वपूर्ण संशोधन आहे. यामुळे प्रौढ गॉम्फोथेरस हत्ती कसे होते हे जाणून घेण्यास मदत झाली, शिवाय त्यांच्या सांगाड्यातील प्रत्येक हाडाचीही माहिती घेऊन तिची नोंद ठेवण्यास मदत झाली.

गिनेसविले येथील 'मोंटब्रुक साईट' नावाने ओळखल्या जाणार्‍या ठिकाणी केलेल्या उत्खननात असे अवशेष सापडले. त्यामध्ये एका प्रौढ हत्तीचा संपूर्ण सांगाडा सापडला असून किमान सात लहान गॉम्फोथेरेस हत्तींचे अवशेष सापडले आहेत. हा प्रौढ हत्ती त्याच्या खांद्यांपर्यंत 8 फूट उंचीचा होता. त्याची कवटी आणि सुळे यांची लांबी 9 फूट होती. सध्याच्या आफ्रिकन हत्तींइतकीच ही लांबी आहे.

SCROLL FOR NEXT