इजिप्तमध्ये पाच हजार वर्षांपूर्वीच्या मद्याच्या सुरयांचा शोध Pudhari File Photo
विश्वसंचार

इजिप्तमध्ये पाच हजार वर्षांपूर्वीच्या मद्याच्या सुरयांचा शोध

या सुरयांपैकी अनेक आजही सीलबंद स्थितीत

पुढारी वृत्तसेवा

कैरो : इजिप्तमध्ये पुरातत्त्व संशोधकांनी एक अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक शोध लावला आहे. राणी मेरिट-नीथच्या थडग्याच्या अवशेषांतून तब्बल 5,000 वर्षांपूर्वीचे वाईनचे सिरॅमिक जार शोधण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या सुरयांपैकी अनेक आजही सीलबंद स्थितीत असून, त्यामध्ये वाईनचे अंशही असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

क्रिस्टियाना कोहलर यांच्या नेतृत्वाखाली वियना विद्यापीठाच्या टीमने ही खोदाई केली आहे. या शोधामुळे प्राचीन इजिप्तमध्ये वाईन कशी तयार केली जात होती, कशी साठवली जायची आणि कोणासाठी वापरली जायची, याविषयी महत्त्वपूर्ण माहिती समोर येणार आहे. राणी मेरिट-नीथ इ.स.पू. 3000 च्या सुमारास इजिप्तवर राज्य करत होती. तिच्या थडग्यात सापडलेल्या सिरॅमिकच्या शेकडो मद्याच्या सुरया आजही चांगल्या स्थितीत आहेत. काही सुरयांवरील मूळ झाकण आजही आहे; तर काही सुरयांमध्ये द्राक्षांच्या बिया आढळल्या आहेत, जे या शोधाला वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही अतिशय महत्त्वाचे बनवतात.

या थडग्यात शिलालेख आणि दरबारी व्यक्तींच्या कबरीही सापडल्या आहेत, जे वाईनचा उपयोग अंत्यसंस्काराच्या विधींमध्ये केला जात असे, याचा स्पष्ट पुरावा देतात. सीलबंद सुरयांवरून असं दिसून येतं की, प्राचीन इजिप्तच्या लोकांनी वाईन जतन करण्यासाठी खास तंत्र विकसित केलं होतं. आजही वाईन सुरक्षित ठेवण्यासाठी आणि ती जुनी करण्यासाठी अशीच पद्धत वापरली जाते. राणी मेरिट-नीथच्या थडग्यात सापडलेली ही वाईन केवळ एक पुरातात्त्विक शोध नसून, ती प्राचीन आणि आधुनिक जगामधला एक सांस्कृतिक पूल आहे. संशोधन जसजसं पुढं जाईल, तसतसं ही शोध मोहीम वाईन निर्मितीच्या इतिहासात क्रांतिकारी बदल घडवू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT