Indian origin Koreans | 50 लाख कोरियन नागरिक स्वतःला मानतात भारतीय वंशाचे! 
विश्वसंचार

Indian origin Koreans | 50 लाख कोरियन नागरिक स्वतःला मानतात भारतीय वंशाचे!

अयोध्येची राजकुमारी बनली होती कोरियाची राणी

पुढारी वृत्तसेवा

अयोध्या : भारतात आलेल्या दक्षिण कोरियाच्या खासदार जेवॉन किम या अभिमानाने सांगतात की, अयोध्या आणि कोरियाचे संबंध शेकडो वर्षांपूर्वीचे आहेत. रामनगरी अयोध्येत आता भव्य राम मंदिर तयार झाले आहे, दीपोत्सव साजरा केला जातो आणि आता राम मंदिर ध्वजारोहणाचा कार्यक्रमही झाला आहे. दक्षिण कोरियाचे लोक अयोध्येतील प्रत्येक बातमी मोठ्या उत्सुकतेने वाचतात. ते रामनगरीशी एक गहरे नाते जोडतात. खासदार जेवॉन किम यांनी सांगितले की, भारतीय राजकुमारी, माझ्या पणजी, माझे पूर्वज, त्यांचा या अयोध्यानगरीशी जवळचा संबंध आहे!

‘समयुग युसा’ या 13 व्या शतकातील ग्रंथानुसार, अयोध्याची राजकुमारी सुरीरत्ना जलमार्गाने प्रवास करत दक्षिण कोरियाच्या बुसान प्रदेशात पोहोचल्या. तेथे त्यांचा विवाह स्थानिक राजकुमार किम सुरो यांच्याशी झाला. काही वर्षांनंतर ते राजा बनले. राजकुमारी सुरीरत्ना यांना क्वीन हूह वांग-ओके या नावाने ओळखले जाऊ लागले. या दोघांनी उत्तम शासन केले आणि जनतेच्या हितासाठी अनेक कार्ये केली, ज्यामुळे ते लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाले. दक्षिण कोरियामध्ये अयोध्या क्षेत्रातील भारतीय वंशाचे अनेक लोक राहतात, असे मानले जाते.

तेथील पाच कोटी नागरिकांपैकी जवळपास 50 लाख लोक याच वंशाचे आहेत. ते आजही स्वतःला भारतीय वंशाशी जोडलेले मानतात. कोरियाला जाताना राजकुमारी आपल्यासोबत सोन्याची नाणी (स्वर्णमुद्रा), रत्ने आणि जवाहिरे नौकेतून घेऊन गेल्या होत्या. जुन्या काळात खूप मोठ्या नौका असत आणि जड वस्तूंचा समतोल राखण्यासाठी त्यात तेवढ्याच वजनाचे मोठे दगड आणि शिळा ठेवल्या जात असत. ज्या ठिकाणी राजकुमारी उतरल्या, तिथे एक स्मारक उभारले गेले आहे. या ठिकाणी राजकुमारीच्या नौकेसोबत आलेल्या त्या दगडी शिळाही जतन करून ठेवल्या आहेत. किम सुरो आणि क्वीन हूह वांग-ओके यांचे पुतळे देखील तेथे आहेत.

स्मारकाच्या आसपास ठेवलेल्या दगडांबद्दल स्थानिक लोकांची अशी श्रद्धा आहे की, जर कोणी त्या दगडाचा एक छोटा तुकडा घेऊन समुद्री प्रवासाला गेला, तर तो निश्चितपणे सुरक्षित परत येतो. या श्रद्धेमुळे तेथील लोकांनी त्या दगडांचा बराचसा भाग उचलून नेला आहे. पण, आता सरकारने त्या दगडांना देशाची अमूल्य धरोहर मानून, त्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना स्पर्श करण्यावर किंवा उचलण्यावर बंदी घातली आहे. अशाप्रकारे, अयोध्येच्या या शिळांना कोरियामध्ये एकाप्रकारे पूजले जाते आणि त्यांचे संरक्षण केले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT