Germany Archaeology | जर्मनीतील ४०,००० वर्षे जुन्या नखाच्या आकाराच्या पक्ष्यांच्या मूर्ती 
विश्वसंचार

Germany Archaeology | जर्मनीतील ४०,००० वर्षे जुन्या नखाच्या आकाराच्या पक्ष्यांच्या मूर्ती

पुढारी वृत्तसेवा

बर्लिन : जर्मनीतील एका प्राचीन गुहेच्या उत्खननादरम्यान पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या हाती अत्यंत दुर्मीळ आणि आश्चर्यकारक ऐतिहासिक ठेवा लागला आहे. माणसाच्या नखाच्या आकाराच्या एवढ्या आणि सुमारे ४०,००० वर्षे जुन्या असलेल्या पक्ष्यांच्या दोन लहान मूर्ती या गुहेत आढळून आल्या आहेत.

आदिमानवाच्या कलाकुसरीचा हा एक अद्‌भुत नमुना मानला जात आहे. या मूर्ती आकाराने अत्यंत लहान म्हणजे अवघ्या काही मिलिमीटरच्या असून एका नखाच्या आकाराएवढ्या आहेत. एवढ्या सूक्ष्म आकाराच्या वस्तूवर ४० हजार वर्षांपूर्वीच्या मानवाने केलेली नक्षीकाम अचंबित करणारी आहे. प्राथमिक तपासणीनुसार, या मूर्ती त्या काळात आढळणाऱ्या ‘मॅमथ'चे (प्राचीन विशालकाय केसाळ हत्ती) सुळे कोरून तयार करण्यात आल्या असाव्यात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

हा शोध पाषाण युगातील मानवाच्या कल्पकता, धार्मिक/सांस्कृतिक विचार आणि सूक्ष्म कारागिरीवर प्रकाश टाकतो. या काळातील मानव केवळ जगण्यासाठी संघर्ष करत नव्हता, तर त्याला कलेची आणि शिल्पकलेचीही उत्तम जाण होती, हे यावरून सिद्ध होते. जर्मनीतील ‘हॉहले फेल्स' किंवा त्याच्या आसपासच्या प्रसिद्ध गुहा क्षेत्रात हा शोध लागला असून, यापूर्वीही या भागात जगातील सर्वात जुन्या मानवी आकृत्या आणि संगीताची वाद्ये सापडली आहेत. हे नवे पक्षी शिल्प मानवी इतिहासातील शिल्पकलेचा सर्वात जुना पुरावा मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT