तब्बल चार फूट लांबीचा आणि 45 किलो वजनाचा फणस.  Pudhari File Photo
विश्वसंचार

तब्बल 4 फूट लांबीचा फणस

पुढारी वृत्तसेवा

कटनी : मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील एक फणस पाहून लोक थक्क झाले. या फणसाचा आकार इतका मोठा होता की, त्याला कुणी खरेदीदारही मिळेना. अखेर या शेतकर्‍याने हा भला मोठा फणस केवळ दोनशे रुपयांना विकून तो घरी निघून गेला. हा फणस तब्बल चार फूट लांबीचा आणि 45 किलो वजनाचा होता!

कटनी जिल्ह्यातील बरही बसस्टँडवर हा शेतकरी फणसाने भरलेली अनेक पोती घेऊन उतरला. मात्र, लोकांची नजर या चार फूट लांबीच्या फणसावर खिळून राहिली. हा फणस गाडीतून खाली उतरून घेण्यासाठी तीन-चार जण लागले! कसेतरी हा फणस घेऊन शेतकरी बाजारपेठेत पोहोचला. त्याचे अधिक वजन आणि आकार पाहून लोक आश्चर्य करीत; पण हा फणस खरेदी करण्याचे धाडस मात्र करीत नव्हते. अनेक तास असेच गेल्यावर शेवटी या वृद्ध शेतकर्‍याला नाइलाजाने हा फणस केवळ दोनशे रुपयांमध्ये विकावा लागला. असे सांगितले जाते की, हा शेतकरी शहडोल जिल्ह्यातील छतैनी गावचा होता. एका स्थानिक दुकानदार महिलेने हा फणस खरेदी केला. हा शेतकरी दरवर्षी मोठ्या आकाराचे फणस घेऊन येतो, असे तिने सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT