3400 वर्षांपूर्वीचे कुत्र्याचे हलते हस्तिदंती शिल्प 
विश्वसंचार

3400 वर्षांपूर्वीचे कुत्र्याचे हलते हस्तिदंती शिल्प

ancient dog sculpture : कुत्र्याचे हे शिल्प कुत्र्याबद्दल असलेल्या प्रेमाची देते साक्ष

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये तब्बल 3400 वर्षांपूर्वीचे कुत्र्याचे अतिशय सुरेख असे शिल्प आहे. हे शिल्प त्या काळात हस्तिदंतापासून बनवण्यात आले होते. कुत्र्याचे हे शिल्प प्राचीन इजिप्तमधील लोकांच्या त्यांच्या पाळीव कुत्र्याबद्दल असलेल्या प्रेमाची साक्ष देते.

हे 18.2 सेंटीमीटर (7.2 इंच) लांब शिल्प एक झेप घेत असलेल्या कुत्र्याच्या स्थितीत आहे, त्याचे पाय हवेत पसरलेले दिसतात. विशेष म्हणजे, या शिल्पाच्या जबड्याला एक लीव्हर यंत्रणा आहे, जी वर-खाली केल्यावर कुत्र्याचा खालील जबडा उघडतो आणि दोन दात आणि लाल जिभा दिसतात, जणू तो भुंकत आहे. सुरुवातीला ही लीव्हर प्रणाली एका चामड्याच्या दोरीने सांधलेली होती, पण नंतर ती धातूच्या रॉडने बदलण्यात आली. हे कुत्र्याचे शिल्प मेट म्युझियमला प्रसिद्ध इजिप्शियन पुरातत्त्वशास्त्रज्ञ हावर्ड कार्टर यांच्या खाजगी संग्रहातून मिळाले. कार्टरने 1922 मध्ये किंग तुतानखामेनच्या थडग्याचा शोध लावला होता. जरी या कुत्र्याचे शिल्प नेमके कुठे सापडले याची माहिती मिळत नाही, तरी ते राजा अमेनहोटेप तिसर्‍याच्या (किंग तुतचा आजोबा) कारकीर्दीत, इ.स.पू. 14व्या शतकात, एखाद्या उच्चभ्रू कबरीत ठेवले गेले असावे, असे मेट संग्रहालयाचा अंदाज आहे. या शिल्पाचा नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. ते कदाचित एक खेळणे असावे किंवा एखाद्या जादुटोण्याच्या विधीसाठी वापरण्यात आले असावे.

इजिप्तमध्ये कुत्र्यांना खूप सन्मान मिळत असे. काही कुत्र्यांच्या वापर शिकार, गुरे राखणे आणि पहारेकरी म्हणून केला जात असे, तर बरेच कुत्रे पाळीव प्राणी म्हणून घरात ठेवले जात असत. हे शिल्पही एका पाळीव कुत्र्याचे प्रतिनिधित्व करते, कारण त्याच्या गळ्यातील खोदलेल्या रेषा कॉलर असल्याचे दर्शवतात, असे मेटच्या माजी क्युरेटर कॅथरीन रोएरीग यांनी नमूद केले आहे. नव्या राज्यकालीन इजिप्तमध्ये (इ.स.पू. 1550 - 1070) कुत्र्यांचे कॉलर अधिक सुशोभित बनवले जाऊ लागले. काही कॉलर्सवर कुर्त्यांची नावे कोरलेली असत, जसे की माइहरप्रीच्या थडग्यात सापडलेल्या कॉलर्सवर होती. या शिल्पातील कुत्र्याच्या कॉलरवर नाव नाही, पण मेटच्या नोंदीनुसार, त्या काळातील काही प्रसिद्ध इजिप्शियन कुत्र्यांची नावे होती - ब्लॅकी, सोन ऑफ द मून आणि गुड-फॉर-नथिंग. या शिल्पातील कुत्रा नेमक्या कोणत्या जातीचा आहे, हे स्पष्ट नाही. मात्र, इजिप्शियन लोकांना उत्साही आणि धावपटू जातीचे कुत्रे आवडत असत, जसे की बसेन्जी, इबिझन हाउंड आणि फेरो हाउंड यांचे पूर्वज. इजिप्तमध्ये कुत्र्यांच्या अनुबिस देवता आणि मृत्यूपश्चात जीवनाशी संबंधित द़ृष्टिकोन होता. कॉलर असलेल्या कुत्र्याला मारणे हा एक गंभीर गुन्हा मानला जात असे. एवढेच नव्हे, तर कुत्रा मरण पावल्यास कुटुंब त्याच्यासाठी दुःख व्यक्त करत असे, अगदी मानवी नातेवाईकाच्या मृत्यूप्रमाणे, म्हणजेच आपल्या भुवयांचे मुंडण करीत असत. इजिप्तवासीयांना असेही वाटत असे की त्यांना परलोकात आपल्या कुत्र्यांची पुनर्भेट होईल, म्हणूनच त्यांनी कुत्र्यांचे ममीकरण केले आणि त्यांना विशेष पाळीव प्राण्यांच्या थडग्यांमध्ये पुरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT