विश्वसंचार

33 हजार फुटांवरून पडूनही ‘ती’ बचावली

Arun Patil

स्टॉकहोम : आतापर्यंत प्लेन क्रॅशच्या अनेक घटना ऐकल्याही असतील आणि पाहिल्याही असतील. मात्र, 33 हजार फूट उंचीवर प्लेन क्रॅश झाले असेल तर त्यातील एकही प्रवासी बचावणार नाही, हे नक्की! आता आपण अशा एका एअरहोस्टेसबाबत जाणून घेणार आहोत की, 33 हजार फूट उंचीवरून पडूनही ती बचावली. यावर तुमचा विश्वास बसणार नाही; पण ही गोष्ट खरी आहे. तारीख आहे, 1972 मधील 26 जानेवारी, एक विमान स्टॉकहोमहून सर्बियाच्या बिलग्रेडकडे जात होते. त्या विमानाचे नाव होते जेट प्लाईट 367. यामध्ये सुमारे 28 प्रवासी होते. आतापर्यंत सर्वकाही चांगले चालले होते. विमान 33 हजार फुटांवर पोहोचले.

एक एअरहोस्टेस खाण्या-पिण्याच्या साहित्याच्या ट्रॉलीसह एका प्रवाशांकडे जात होती. त्याचवेळी प्रवाशांचे साहित्य ठेवले त्याठिकाणी जोराचा धमाका झाला. स्फोट एवढा मोठा होता की विमानाला आग लागली आणि विमानाचे तीन तुकडे झाले. चेकोस्लोव्हाकियातील श्रीबस्का कामेनिसमध्ये हे विमान कोसळले. त्यावेळी ब्रेनो नावाच्या एका व्यक्तीची नजर एका तरुणीवर पडली, ती विव्हळत होती आणि पाणी मागत होती. ती महिला खूपच गंभीर अवस्थेत पडून होती. त्यानंतर ब्रेनोने तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. ती तरुणी दहा दिवसांनी शुद्धीवर आली. तिने आपले नाव वेस्ना क्लोविक असे सांगितले. विमान अपघातात वाचलेली ती एकमेव होती. दैव बलवत्तर म्हणूच ती मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडली.

SCROLL FOR NEXT