उत्तराखंडमध्ये सापडला तब्बल 25 फुटांचा अजगर Pudhari File Photo
विश्वसंचार

उत्तराखंडमध्ये सापडला तब्बल 25 फुटांचा अजगर

त्याचे वजन तब्बल 170 किलो आहे

पुढारी वृत्तसेवा

डेहराडून : उत्तराखंडमधील रामनगर येथे तब्बल 25 फूट लांबीचा अजगर पकडण्यात आला. त्याचे वजन तब्बल 170 किलो आहे. हा अजगर उचलण्यासाठी सहा-सात माणसं लागली! अजगराचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियातही व्हायरल होत आहेत.

‘एक्स’वर याबाबतचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, उत्तराखंडच्या रामनगरमध्ये आजपर्यंतचा सर्वात मोठा अजगर पकडण्यात आला, ज्याची लांबी 25 फूट व वजन 170 किलो आहे. या अजगराला पकडून जंगलात सोडून देण्यात आले. या व्हिडीओच्या प्रारंभी हा अजगर जमिनीवर ठेवलेला दिसून येतो. अनेक लोक या अजगराचे व्हिडीओ बनवत असतानाही दिसतात. त्यानंतर सहाजण या अजगराला उचलतात आणि त्यांचे फोटो काढले जातात. 54 सेकंदांच्या या क्लिपमध्ये अनेक लोक अजगराकडे कुतूहलाने पाहत असताना दिसून येतात. वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी हा अजगर पकडून त्याला जंगलात सुरक्षित स्थळी सोडून दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT