Trending Wedding Story | २२ वर्षांच्या तरुणाने केले ७२ वर्षांच्या वृद्धेशी लग्न! 
विश्वसंचार

Trending Wedding Story | २२ वर्षांच्या तरुणाने केले ७२ वर्षांच्या वृद्धेशी लग्न!

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्कः प्रेमाला वयाची अट नसते. कधी कोणावर प्रेम होईल हे सांगता येत नाही. अनेकवेळा दोन भिन्न देशांचे तरुण-तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे समोर आलेले आहे. पाकिस्तानची सीमा हैदर आणि भारताचा सचिन मीणा याचं सर्वात गाजलेलं उदाहरण आहे. सध्या मात्र अजब-गजब प्रेमाची जगभरात चर्चा होत आहे. या लव्हस्टोरीबाबत सोशल मीडियावर वेगवेगळी मतं व्यक्त केली जात आहे. इन्स्टाग्रामच्या एका पेजवर या प्रेम प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार एक २२ वर्षांचा तरुण आपल्यापेक्षा ५० वर्षांपेक्षा मोठ्या म्हणजेच ७२ वर्षीय वृद्ध महिलेच्या प्रेमात पडला आहे. या कपलने अधिकृतपणे लग्नही केलं असून, त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आगळ्या-वेगळ्या प्रेमाची ही कथा डोमिनिकन रिपब्लिक या देशातील आहे. या देशातील २२ वर्षीय डॅनियल रामिरेज आणि अमेरिकेची ७२ वर्षीय एलेनोर हेज हे एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. या दोघांनीही प्रेमविवाह केला आहे. डॅनियल एका छोट्याशा कॅफेत आपल्या कुटुंबाला मदत करायचा. साधारण दोन वर्षांपूर्वी एलेनोर हेज सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी डोमिनिकन रिपब्लिकमध्ये फिरायला आल्या होत्या व त्यावेळी त्यांची भेट डॅनियलशी झाली. त्या अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये राहतात. त्या रिअल इस्टेट इन्व्हेस्टर आहेत.

डॅनियलशी भेट झाल्यापासून त्या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. हीच जवळीक नंतर प्रेमात बदलली. दोघांच्या वयामध्ये साधारण ५० वर्षांचा फरक आहे. परंतु, आता ‘एलेनोर माझा जीव आहे. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. तीदेखील माझ्यावर खूप प्रेम करते’, असे डॅनियल सांगतो. वय हा फक्त एक आकडा आहे. आम्ही दोघेही एकमेकांना खूप समजून घेतो, असंही त्याचं मत आहे. एलेनोर या अमेरिकेतील कोट्यधीश आहेत. डॅनियलने एलेनोर यांची संपत्ती पाहूनच त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, अशा कमेंटस्‌ सोशल मीडियावर केल्या जात आहेत. तर काही नेटकऱ्यांनी या दोघांना पाठिंबा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT