नवी दिल्ली : युरोपियन स्पेस एजन्सीच्या मार्स एक्स्प्रेस मोहिमेने मंगळाच्या पृष्ठभागावर एका विशाल आणि विलक्षण नैसर्गिक कलाकृतीचे छायाचित्रण केले आहे. ही कलाकृती म्हणजे एक फुलपाखराच्या आकाराचे मोठे विवर आहे. हे विवर सुमारे 20 किलोमीटर रुंद (पूर्व ते पश्चिम) आणि 15 किलोमीटर लांब (उत्तर ते दक्षिण) आहे. मंगळाच्या उत्तर सखल प्रदेशातील आयडियस फॉसी भागात हे विवर आढळले आहे.
युरोपियन स्पेस एजन्सीनुसार, हे फुलपाखरूसारखे दिसणारे विवर एका उथळ कोनातून झालेल्या आकाशातील वस्तूच्या टकरामुळे तयार झाले आहे. जेव्हा एखादा दगड कमी कोनातून आदळतो, तेव्हा आघाताची ऊर्जा विषमपणे पसरते, ज्यामुळे दोन्ही बाजूंना पंखांसारखे दोन मोठे भाग तयार होतात. या पसरलेल्या पंखांच्या मध्यभागी असलेला लांबट मध्यवर्ती खड्डा फुलपाखराचा आकार पूर्ण करतो. मार्स एक्स्प्रेस या दीर्घकाळ चाललेल्या मोहिमेवरील उच्च रिझोल्यूशन स्टिरिओ कॅमेर्यातून या भूभागाचे एक अप्रतिम त्रिमितीय छायाचित्र प्राप्त झाले आहे.
आघातामुळे बाहेर फेकलेल्या आणि वेळेत गोठलेल्या सामग्रीमुळे तयार झालेल्या दर्या या छायाचित्रात दिसतात. आयडियस फॉसी प्रदेशात भेगा आहेत. त्यामुळे मंगळाच्या कवचाच्या ताण आणि पतनाच्या दीर्घ भूगर्भीय इतिहासाची मिळण्यास मदत होते. 2004 पासून कार्यरत असलेल्या मार्स एक्स्प्रेसने मंगळाच्या पृष्ठभागाचे आणि वातावरणाचे अनेक तपशीलवार जागतिक नकाशे तयार केले आहेत. तसेच, मंगळाच्या जलमय भूतकाळावर या मोहिमेने प्रकाश टाकला आहे. हे नवीनतम छायाचित्र विज्ञान आणि कलेचे दर्शन घडविणारे ठरले आहे. त्यामुळे ग्रहांवरील आघात पृथ्वीवरील नैसर्गिक आकारांची आठवण करून देणार्या प्रतिमांमध्ये मंगळाला कसे आकार देतात, हे स्पष्ट होते.