Oldest Tortoise | तब्बल १९४ वर्षे वयाचे कासव! 
विश्वसंचार

Oldest Tortoise | तब्बल १९४ वर्षे वयाचे कासव!

पुढारी वृत्तसेवा

लंडन : विचार करा, या पृथ्वीवर असा कोणता जीव असू शकतो, ज्याने पॅरिसचा आयफेल टॉवर किंवा न्यूयॉर्कचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी उभारताना पाहिले असेल? एवढेच नाही, तर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचा काळ अनुभवत ब्रिटनचे ८ राजे-राण्या आणि अमेरिकेचे तब्बल ४० राष्ट्राध्यक्ष बदलताना पाहिले आहेत? ऐकायला हे एखाद्या कल्पनेसारखे वाटत असले, तरी हा जगातील सर्वात वयस्कर जीव आजही या पृथ्वीवर जिवंत आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्‌ने अधिकृतपणे जागतिक आयकॉनचा दर्जा दिलेला हा जीव कोणताही माणूस नसून, एक अवाढव्य कासव आहे, ज्याचे नाव जोनाथन आहे.

जोनाथन हा सेशेल्स प्रजातीचा एक विशालकाय कासव आहे. सामान्यतः या प्रजातीच्या कासवांचे आयुष्य १५० वर्षांपर्यंत असते. मात्र, जोनाथनने २०२६ मध्ये आपल्या आयुष्याची अविश्वसनीय अशी १९४ वर्षे पूर्ण केली आहेत. आजच्या घडीला तो जगातील सर्वात जास्त जगणारा जमिनीवरील प्राणी ठरला आहे. हा अद्‌भुत जीव सध्या दक्षिण अटलांटिक महासागरातील सेंट हेलेना या बेटावर अतिशय दिमाखात आणि सुरक्षितपणे जगत आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्‌च्या माहितीनुसार, जोनाथनचा जन्म साधारणपणे १८३२ मध्ये झाला होता. तो काळ विक्टोरियन युग, लंडनचा टॉवर ब्रिज आणि पेरिसच्या एफिल टॉवरच्या निर्मितीच्याही आधीचा आहे.

स्थानिक लोक जोनाथनला प्रेमाने 'ओल्ड जोनो' म्हणून हाक मारतात. जोनाथनने ब्रिटनचे राजे किंग विल्यम IV यांच्या राजवटीपासून ते सध्याचे राजे किंग चार्ल्स III यांच्यापर्यंत एकूण ८ ब्रिटिश राजघराण्यांचा काळ पाहिला आहे. तसेच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू यांच्यापासून ते आतापर्यंतच्या ४० पेक्षा जास्त राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ त्याच्या आयुष्यात बदलला आहे. तिथले पशुवैद्यकीय अधिकारी सांगतात की, जोनाथनची प्रकृती अजूनही उत्तम आहे आणि त्याला भूकही चांगली लागते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT